Wednesday, May 29, 2024
Homeनगर‘लव्ह जिहाद’च्या घटनेने कोपरगाव हादरले

‘लव्ह जिहाद’च्या घटनेने कोपरगाव हादरले

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरातील मध्यावर्ती भाग असलेल्या इंदिरापथ येथील 20 वर्षीय युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर कोपरगाव खडकी जवळील मदरशात नेऊन चौघांनी तिच्या मर्जीविरोधात शरीरसंबंध करुन त्याचे फोटो व व्हिडिओ तयार करून युवतीला ब्लॅकमेल करुन इंदोर येथे बोलावून तिच्यावर पुन्हा अतिप्रसंग व बळजबरीने धर्मांतर करुन तिच्याकडून नमाज पठण केल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात इंदोरच्या मौलवीसह पाच जणांवर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

गेल्या काही महिन्यांपासून देशात लव्ह जिहाद, हनी ट्रॅप, लँड जिहाद, गेम जिहाद अशा अनेक प्रकारच्या जिहादाची प्रकरणे समोर आली आहेत. अशातच श्रद्धा वालकर आणि दिल्लीमधील साक्षी मर्डर केसमुळे या मुद्यावर पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. वारंवार असे प्रकार समोर येत असूनही हिंदू मुली मुस्लिमांच्या जाळ्यात अडकत आहेत. आजूबाजूला सारे काही स्पष्ट दिसत असतानाही डोळे झाकून या मुली मुस्लिमांवर विश्वास ठेवतात. लव जिहाद रोखण्यात खरे तर हेच एक मोठे आव्हान असताना कोपरगाव शहरात देखील अशीच एक घटना उघडकीस आली आहे. शहरातील एका 20 वर्षीय युवतीने दिलेल्या फिर्यादीवरुन सायम कुरेशी, रा. जुना पिठा इंदौर मध्यप्रदेश, इमरान अयुब शेख, रा. कोपरगाव, छोटू उर्फ कलिम (पूर्ण नाव माहीत नाही), फय्याज (पूर्ण नाव माहीत नाही दोघे रा. कोपरगाव व इंदोर येथील मौलवी पूर्ण नाव माहिती नाही अशा पाच जणांविरुद्ध दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, आरोपी सायम कुरेशी याने तीन वर्षापूर्वी मोबाईलवरुन फिर्यादीशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर एक वर्षाने तिस प्रेमाच्या जाळ्यात ओढून दि. 21 मे 2023 रोजी सकाळी 6 ते 12 दरम्यान आरोपी सायम कुरेशी याने फिर्यादी व तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यांनी त्यास विरोध केला असता वरील आरोपींपैकी नं. 1 ते 4 यांनी संगनमताने फिर्यादीचे हातपाय धरुन तिचे मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तिला बळजबरीने तिच्याच मोटरसायकलवर ट्रिपल सिट बसून खडकी जवळील मदरशात घेवून गेले व आरोपी तिच्यावर बळजबरीने शरीरसंबंध केले. त्याचे फोटो व व्हिडिओ तयार करुन हे फोटो व व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करील अशी धमकी देवून फिर्यादीस इंदोर येथे बोलावून घेतले. तेथे देखील एका घरात आरोपी सायम याने फिर्यादीशी बळजबरीने शरीरसंबंध केला व इंदोर येथील एका मौलवीकडून बळजबरीने फिर्यादीस नमाज पठण करण्यास लावले. तसेच धर्मांतरासाठी व आरोपी सायम बरोबर लग्न करण्यासाठी दबाव आणला. वेळोवेळी फिर्यादीचे आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. सदर गुन्ह्यातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे दोन पथके रवाना झाली असल्याची माहिती तपासी अधिकारी पो.स. इं. भरत दाते यांनी दिली. या घटने बाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 376, 363, 354, 328, 295, 504, 506, 34 प्रमाणे वरील पाचही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. कोपरगावात देखील अशा अनेक घटना घडत आहेत. मुस्लिम समाजाचे प्रार्थनास्थळ असलेल्या मदरशामध्ये जर हिंदू तरुणीवर अत्याचार होत असेल तर अशा आरोपींसह मदारसा चालकांविरुद्ध कडक कारवाई करावी व संबंधितांवर कठोर कारवाई करावी. त्यांच्यावर कारवाई लवकर न झाल्यास कोपरगावमध्ये लवकरच मोठे आंदोलन उभे करणार आहे. या घटनेची तीव्रता लक्षात घेता याच्या निषेधार्थ इतर गोष्टींमध्ये धर्मांची ठेकेदारी करणार्‍यांनी या गोष्टीची शरम बाळगून पुढे आले पाहिजे.

विजय वहाडणे, माजी नगराध्यक्ष

मदरशात जर हिंदू तरुणीवर हात पाय बांधून बलात्कार होत आहेत. ज्या प्रमाणे उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारने असे मदरसे जमिनदोस्त केले अशीच कठोर कारवाई महाराष्ट्र सरकारने करून कोपरगावातील या घटनेच्या मदरशाचा देखील नायनाट करावा अशी मागणी कोपरगावसह जिल्ह्यातील विविध हिंदू संघटनानी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या