Saturday, May 4, 2024
Homeनाशिकनाशिक आणि गोदेवर शतदा प्रेम करावे : डॉ. कमोद

नाशिक आणि गोदेवर शतदा प्रेम करावे : डॉ. कमोद

नाशिक । प्रतिनिधी Nashik

तिर्थक्षेत्रामुळे देशभरात व कुंंभमेळ्यामुळे Kumbhmela जगभरात नाशिकला लौकीक प्राप्त झाला असून हा लौकिक अधिक वृध्दींगत होण्यासाठी श्रध्दा व अंंधश्रध्देचे अवडंंबर न माजवता नाशिकचे महात्म्य टिकवले पाहीजे, या नाशिकवर आणि या गोदेवर शतदा प्रेम करावे, असे प्रतिपादन डॉ. कैलास कमोद Dr Kailas Kamod यांंनी आज येथे केले.

- Advertisement -

नाशिक इतिहास संशोेधन मंंडळ, पुरातत्त्व विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यातर्फे सुरु असलेल्या गोदा महोत्सवाचे Goda Festival तिसरे पुष्प डॉ. कमोद यांंनी गोदाघाटावरचे नाशिक या विषयावर गुंफले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक विजय निपाणेकर होते.

डॉ.कमोद यांनी जगभरातील व देशातील विविध नद्यांचे महत्त्व त्यांंच्यामुळे विकसित झालेली शहरे यांची माहिती दिली. ते म्हणाले की, गोदावरी नदी ही नाशिककरांच्या प्रत्येक सुखदुःखाची साक्षीदार आहे. नदीकाठी वसलेल्या मंदिरांमुळे नाशिकचे सौंदर्य बहरले आहे. त्यामुळे पर्यटन वाढले. प्रत्येक हाताला रोजगार मिळाला. नदीमुळे मानवी वस्ती विकसीत झाली. रेल्वेमुळे देशभरातील भाविक नाशिकला येऊ लागले.

मुंबई-आग्रा महामार्गामुळे उत्तर भारतीयांचा ओढा वाढला. धऱणामुळे नाशिकच्या विकासाला चार चांद लागले. औद्योगिकीकरण वाढले. शेती बहरली. देश-विदेशात नाशिकची द्राक्ष,कांंदे,गुलाब जाऊ लागले. मुंबईची परसबाग नाशिक केवळ या पाण्याच्या उपलब्धतेमुळे झाली. पूर्वी अतिशय छोेटे शहर असलेले आता मेट्रोसिटीकडे वाटचाल करत आहे. कुंभमेळ्यामुळे जागतिक नकाशावर त्याला स्थान प्राप्त झाले आहे.

काही झाले तरी नाशिकची ओेळख धार्मिक क्षेत्र म्हणूनच राहणार आहे. त्यामुळे श्रध्दा व अंंधश्रध्देेचे अवडंबर न माजवता नाशिकची धार्मिक क्षेत्र म्हणून असलेली ओेळख कायम ठेवून हे शहर विकसीत करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आभार रमेश पडवळ यांंनी मानले. यावेळी नाशिककर गोदाप्रेेमी उपस्थित होते.

शेवटी दत्तात्रय कोठावदे यांनी गोदावरीच्या उगमापासून ते नाशिकंच्या प्रत्येक गोष्टीची ती कशी साक्षीदार आहे, याचे वर्णन केले.

आज आनंद बोरा यांचे व्याख्यान

महोत्सवाचे चौथे पुष्प शनिवारी आनंंद बोरा हे गोदाकाठचे पक्षी जीवन या विषयावर गुंंफणार आहेत. सायंंकाळी साडेपाच वाजता दरबार हॉलमध्ये हे व्याख्यान होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या