Friday, April 25, 2025
Homeनगरधक्कादायक! पाथर्डीत आढळले प्रेमी युगुलाचे मृतदेह

धक्कादायक! पाथर्डीत आढळले प्रेमी युगुलाचे मृतदेह

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील माणिकदौंडी (Manikdaundi) परिसरातील घुमटवाडी शिवारात वन विभागाच्या (Forest Department) हद्दीत एका प्रेमी युगुलाचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी (दि.22) रात्री ही घटना उघडकीस आली आहे.

- Advertisement -

प्रसाद सुरेश मरकड (वय 24, रा. दुलेचांदगाव) व भाग्यश्री शंकर वखरे (वय 23, रा.माळेगांव,ता.पाथर्डी) असे मयत प्रेमी जोडप्याचे नाव आहे. पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी परिसरातील घुमटवाडीच्या शिवारात या प्रेमी जोडप्याचे मृतदेह (Lover Couple Dead Body) वन विभागाच्या हद्दीत आढळून आले आहे. प्रसाद याचा एका झाडाला फाशी घेतलेल्या तर भाग्यश्री हिचा जमिनीवर मृतदेह (Dead Body) आढळला. मृतदेह पाथर्डी पोलीस ठाण्याचे (Pathardi Police Station) पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, विलास जाधव या अधिकार्‍यांसह पोलीस पथकाने ताब्यात घेतले. घटनास्थळी दोघांचे मृतदेह हे अर्धवट जळालेल्या स्थितीत होते. तर भाग्यश्रीच्या मृतदेहाचा काही भाग वन्य प्राण्यांनी खाल्ला आहे. परिसराला आग लागल्याने हे मृतदेह जळाले आहेत अशी प्राथमिक माहिती पुढे आले आहे. पोलिसांना घटना घडली त्या परिसरात विषारी औषध व थंडपेयाच्या रिकामा बाटल्या मिळाल्या.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील या वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. प्रसाद व भाग्यश्री हे दोघेही गेल्या दहा दिवसांपासून घर सोडून बाहेर होते. या दोघांच्या नातेवाईकांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात तशी तक्रार दाखल केली होती. प्रसाद मरकड हा अविवाहित तरुण होता तर भाग्यश्री वखरे हिचा विवाह (Marriage) झाला असून तिला एक मुलगा आहे. शनिवारी रात्री ही घटना उघडकीस आली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुहास गायकवाड करीत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...