Tuesday, May 28, 2024
Homeनाशिकभाजीपाल्यास कवडीमोल भाव; शेतकरी हतबल

भाजीपाल्यास कवडीमोल भाव; शेतकरी हतबल

लोहणेर । वार्ताहर Lohner

आठवड्यापासून कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, वांगी ( Cabbage, cauliflower, tomatoes, and Brinjals )यांची चार-पाच रूपयांपेक्षाही कमी दराने विक्री होत असल्याने (Selling at a lower rate ) कसमादे भागातील शेतकरी आर्थिक नुकसानीने अक्षरश: हतबल झाले आहेत. देशी रवैय्या जातीच्या काळ्या वाणाच्या वांग्यास कवडीमोल भाव मिळाल्याने शेतकर्‍यास झाडे उपटून फेकण्याची वेळ आली आहे.

- Advertisement -

भाजीपाला लागवडीचा खर्च ( Cost of cultivation of vegetables )देखील निघत नसल्याने खर्च रूपैय्या आमदनी अठन्नी अशी परिस्थिती उद्भवल्याने शेतकरी हताश झाले आहेत.

कसमादे भागातील शेतकरी आपल्या शेतात कायम नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आघाडीवर आहेत. शेतीमध्ये सतत नवनवीन प्रयोग करण्यासाठी त्याची धडपड सुरू असते. गेल्या वर्षी कोबी, मिरची, टमाटो, वांगी या पिकांना बर्‍यापैकी दर मिळाला होता. साहजिकच यावर्षीही शेतकर्‍यांनी वरील प्रकारच्या भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे.

मागील पंधरवड्यापर्यंत टमाटे, कोबी, वांगी, मिरची या भाजीपाल्याला बर्‍यापैकी दर मिळत होते. दहा-बारा रूपये का होईना भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च तरी पदरात पडत होता. मात्र आठवडा भरापासून कोबी, फ्लॉवर, मेथी, टमाटे, वांगे आदी भाजीपाल्याचे भाव कवडीमोल झाल्याने तो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ उत्पादक शेतकर्‍यांवर आली आहे.

विठेवाडी येथील तरूण शेतकऱी राजेंद्र धनाजी देवरे यांनी दोन एकर क्षेत्रात देशी रैवया जातीच्या काळ्या वानाच्या वांगीची लागवड केली होती. त्यासाठी त्यांनी दोन एकर क्षेत्राकरीता ठिबक सिंचन, पाइप, मल्चींग पेपर, यासाठी 48 हजार रुपये खर्च करून सुरवातीलाच दोन ट्रक शेणखत, रोपे, मशागत यासाठी 50 हजार रुपये खर्च करून लागवड केली आहे. तीन महिन्यात अनेक वेळा रासायनिक खते, जैविक खते, मजुरी, दर आठवड्याला फवारणी यासाठी सुमारे 45 हजार रूपये असा एकूण 1 लाख 50 हजार रुपये खर्च केला आहे.

तीन महिन्याच्या मेहनतीनंतर सुरूवातीला पहिल्या एक-दोन तोडणीला सुरत मार्केटला 400 ते 450 रुपये जाळीला दर मिळाला. खर्च वजा जाता 300 रूपये दर मिळाला खरा परंतु एक आठवडा उलटल्यावर मोठ्या प्रमाणात वांगी निघाली संपूर्ण ट्रकभर वांगी तोडुन सुरत मार्केटला पाठवले तेव्हा काही जाळ्या 160 प्रति जाळीप्रमाणे विक्री झाली. 60 रूपये तोडणी, वाहतूक खर्च वजा जाता 100 रुपये मिळाला. बाकीचे वांगी कवडीमोल भावात घेतल्याने फेकून द्यावी लागली. अद्यापपर्यंत त्यांच्या बिलपट्या आलेल्या नाहीत. मागील आठवड्यात एक ट्रॅक्टर वांगी तोंडुन गिरणा नदीकाठावर फेकुन दिली, अशी माहिती वैफल्यग्रस्त शेतकरी राजेद्र देवरे यांनी दै.‘देशदूत’शी बोलतांना सांगितले.

शेतकरी पूर्णवेळ शेतात राबून मोठ्या कष्टाने उत्पादीत केलेला कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, वांगी, मिरची आदी भाजीपाला बाजारात विक्रीसाठी नेल्यावर तो कवडीमोल भावात घेवून व्यापारी त्यांची लुट करतात. यावर कोणाचेच नियंत्रण नसते. खर्चा रूपया! मिला चार आणा! अशी गत शेतकर्‍यांची झाली आहे. टोमॅटोला बाजारात कमी भाव मिळत असल्याने विठेवाडी, भउर शिवारात ते रस्त्यावर फेकावे लागले.

कुबेर जाधव; समन्वयक स्वाभिमानी संघटना.

- Advertisment -

ताज्या बातम्या