Tuesday, March 25, 2025
Homeदेश विदेशLPG Price : वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिलासा! गॅस सिलिंडरच्या दरात कपात, काय...

LPG Price : वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिलासा! गॅस सिलिंडरच्या दरात कपात, काय आहेत नवे दर?

दिल्ली । Delhi

नवीन वर्ष २०२५ ची पहाट उजाडली असून वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक दिलासादायक बातमी आली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी सिलेंडरच्या किमतीत काहीसा दिलासा दिला मात्र, ही सवलत फक्त व्यावसायिक एलपीजी सिलिंडर म्हणजेच हॉटेलमध्ये वापरात येणाऱ्या सिलिंडरवर देण्यात आली आहे.

- Advertisement -

१ जानेवारी २०२५ रोजी तेल आणि गॅस मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कपात केली असून दिल्ली ते मुंबई गॅस सिलिंडरचे दर १४ ते १६ रुपयांनी कमी झाले आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरसाठी ग्राहकांना आता १,८०४ रुपये मोजावे लागतील तर, मुंबईत व्यवसायिक सिलिंडरची किंमत १,७५६ रुपयांपर्यंत आहे, जी याआधी १,७७१ रुपये होती.

याआधी डिसेंबर महिन्यात व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ झाली होती. महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना झटका बसला होता. याव्यतिरिक्त घरगुती गॅसच्या दरात मात्र कोणताही बदल झालेला नाही. 1 ऑगस्टपासून या गॅसचे दर स्थिर आहेत. आताही यात कंपन्यांनी कोणतेच बदल केलेले नाहीत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...