Monday, April 7, 2025
Homeमुख्य बातम्याLPG Price Hike : पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना आणखी एक झटका;...

LPG Price Hike : पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना आणखी एक झटका; घरगुती गॅस सिलिंडर ‘इतक्या’ रुपयांनी महागला

नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था

केंद्र सरकारने (Central Government) आज (सोमवारी) पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and Diesel) उत्पादन शुल्कात २ रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार असून भारतीयांच्या खिशाला कात्री बसणार आहे. यानंतर आता लगेचच केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG Gas Cylinder) किंमती वाढवत सर्वसामान्यांना आणखी एक झटका दिला आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारने एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ केली असून ही वाढ तत्काळ प्रभावाने लागू करण्यात येणार आहे. याबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी (Petroleum Minister Hardeep Singh Puri) यांनी माहिती दिली आहे. तसेच हे वाढीव दर आज रात्री १२ वाजल्यापासून लागू होणार असून ही दरवाढ प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या (पीएमयूवाय) लाभार्थी आणि गैर-लाभार्थी दोघांनाही लागू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तसेच उज्ज्वला गॅस योजनेच्या (Ujjwala Gas Yojana) लाभार्थ्यांसाठी गॅस सिलिंडरची किंमत ५०० रुपयांवरून ५५० रुपयांपर्यंत वाढेल. तर इतर ग्राहकांसाठी ती ८०३ रुपयांवरून ८५३ रुपयांपर्यंत वाढणार असल्याची माहितीही केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली.

दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत सरकारने एक वर्षानंतर कोणताही बदल केलेला नव्हता. गॅस सिलिंडरच्या किमतीत शेवटचा बदल ९ मार्च २०२४ रोजी करण्यात आला होता. त्यानंतर सरकारने गॅस सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांची कपात केली होती. त्यानंतर आता गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ (Growth) करण्यात आली आहे.

आता कोणत्या शहरात किती रूपयांना मिळणार गॅस सिलिंडर?

घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ झाल्यानंतर देशाची राजधानी दिल्लीत गॅस सिलिंडरची किंमत ८०३ रुपयांवरून ८५३ रुपये होणार आहे. तसेच, कोलकातामध्ये किंमत ८२९ रुपयांवरून ८७९ रुपये, मुंबईत ८०२.५० रुपयांवरून ८५३.५० रुपये आणि चेन्नईमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ८१८.५० रुपयांवरून ८६८.५० रुपये होईल. तर, उज्ज्वला योजनेचा गॅस सिलिंडर घेण्यासाठी ग्राहकांना ५०० रुपयांऐवजी आता ५५० रुपये मोजावे लागणार आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या