Saturday, July 27, 2024
Homeदेश विदेशनव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा चटका, LPG सिलिंडर महागले; जाणून घ्या नवीन...

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा चटका, LPG सिलिंडर महागले; जाणून घ्या नवीन दर

दिल्ली | Delhi

आजपासून नवीन वर्ष २०२३ सुरू झाले आहे. नववर्षासोबतच सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आजपासून गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. विशेष म्हणजे गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

- Advertisement -

मात्र ही दरवाढ कमर्शिअल वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलेंडरसाठी लागू करण्यात आली आहे. तर, घरगुती वापरासाठीच्या एलपीजी (LPG) गॅस सिलेंडरच्या (Gas Cylinder) दरात कोणताही बदल झाला आहे.

विहिरीत पडलेल्या पत्नीला वाचविताना पतीचाही मृत्यू

वाढत्या महागाईच्या काळात दिलासा देण्यासाठी एलपीजीचे दर (LPG Price) कमी करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, सरकारकडून, इंधन कंपन्यांनी कोणताही दिलासा दिला नाही.

दरवाढीनंतर दिल्लीत कमर्शिअल सिलिंडरची किंमत १७६९ रुपये झाली आहे. तर कोलकात्यात आता कमर्शिअल सिलिंडर १८७० रुपयांना मिळेल. मुंबई बद्दल सांगायचं झालं तर या ठिकाणी कमर्शिअल गॅस सिलिंडरची किंमत १७२१ रुपये आणि चेन्नईत ही किंमत १९१७ रुपये झाली आहे.

प्रियकराचं प्रेयसीसोबत धक्कादायक कृत्य, लक्ष्य विचलीत करणारा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

- Advertisment -

ताज्या बातम्या