Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याLTTE प्रमुख प्रभाकरन जिवंत; तमिळ नेत्याचा धक्कादायक दावा

LTTE प्रमुख प्रभाकरन जिवंत; तमिळ नेत्याचा धक्कादायक दावा

मुंबई | Mumbai

लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलमचा प्रमुख (LTTE) वेलुपिल्लई प्रभाकरन याच्याबाबत तमिळ नेत्याने सनसनाटी खुलासा केला आहे.

- Advertisement -

प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा करत योग्य वेळ आल्यावर प्रभाकरन जगासमोर येईल असा दावा तामिळनाडूचे माजी काँग्रेस नेते तथा वर्ल्ड कन्फेडरेशन ऑफ तामिळचे अध्यक्ष पाझा नेदुमारन यांनी केला आहे.

Valentine Day : …आणि हो प्रेमाला वयाची मर्यादाही नसते! आजी-आजोबाच्या VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ

नेदुमारन यांनी म्हंटल आहे की, तामिळ राष्ट्रीय नेता प्रभाकरन जिवंत असल्याची पुष्टी मी करतोय. प्रभाकरनच्या कुटुंबीयांच्या संमतीनेच हा खुलासा करत असल्याचेही त्यांनी सांगितले. लिट्टे प्रमुख जिवंत असून, तो एकदम ठणठणीत असल्याचा दावा नेदुमारन यांनी केला. तसेच, तो लवकरच बाहेर येईल आणि तामिळ लोकांसाठी नवीन योजना जाहीर करेल, असेही नेदुमारन यांनी म्हंटलं आहे.

२००९ मध्ये श्रीलंकन ​​लष्कराने लष्करी कारवाई सुरू केली होती ज्यात प्रभाकरन मारला गेल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता प्रभाकरनबाबत करण्यात आलेल्या या दाव्याने खळबळ उडाली आहे.

Turkey Syria Earthquake : …अन् तो चिमुकला मृत्यूशी नडला! भूकंपाच्या १२८ तासांनी ढिगाऱ्याखालून बाळ सुखरुप बाहेर, VIDEO व्हायरल

कोण आहे प्रभाकरण?

श्रीलंकेच्या राजकारणात प्रभाकरणच्या नावाचा उल्लेख प्रकर्षाने जाणावतो. लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम या संघटनेची स्थापना प्रभाकरनने केली. श्रीलंकेच्या उत्तर आणि पूर्वे भागात स्वतंत्र तामिळ राज्य निर्माण करणं हे त्याचं उद्दीष्ट होतं. LTTE एलटीटीई या संघटनेनं २५ वर्षांहून अधिक काळ श्रीलंकेच्या सैनाशी सशस्त्र लढा दिला.

प्रभाकरनचा जन्म श्रीलंकेच्या उत्तर किनाऱ्यालगत असलेल्या वाल्वेथीथुरै इथं झालं. तो चार भावंडापैरी सर्वात लहान होता. एलटीटीईला श्रीलंकेच्या तामिळ लोकांसाठी स्वायत्तता हवी होती.श्रीलंका सरकार देशातील तमिळ लोकांवर भेदभाव करत असल्याचा आरोप प्रभाकरन आणि त्याच्या संघटनेने कायम केला. 1976 साली प्रभाकरनने लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम या संघटनेची स्थापना केली. ही एक सशस्त्र आणि युद्धनीतीत तरबेज अशा सैनिकांची संघटना होती.

तंदूर रोटी ताटातून गायब होणार? सरकारने घातली बंदी; उल्लंघन केल्यास ५ लाखांचा दंड, जाणून घ्या कारण

1983 साली एलटीटीई संघटनेने जाफाना इथं श्रीलेंकेच्या तळावर हल्ला केला. यात १३ सैनिक गतप्राण झाले. या हल्ल्यानंतर मात्र एक भीषण हत्याकांड घडलं ज्यात शंभरहून अधिक तामिळ नागरिकांनी जीव गमवावा लागला होता. श्रीलंकेमधील सिव्हल वॉरची ही सुरुवात होती. 2006 मध्ये श्रीलंकेच्या सैन्याने एलटीटीईला पराभूत करण्यासाठी कारवाई सुरू केली.

प्रत्येक लष्करशहाप्रमाणे त्याच्याही काही विचित्र सवयी होत्या, तो कधी भात खायचा नाही. प्रभाकरनला वाटायचं की तांदळामुळे पिस्तुलचे ट्रिगर दाबायचे बोट शिथिल होऊन जाईल. लिट्टे जेव्हा ऐनभरात होती तेव्हा प्रभाकरणने पाच विमाने खरेदी केली होती. लिट्टे तेव्हा जगातील एकमेव अतिरेकी संघटना होती ज्यांच्याकडे स्वतःची लढाऊ विमाने होती.भारताचे महत्वाचे नेते राजीव गांधी आणि श्रीलंकेच्या महत्वाच्या नेत्यांची हत्या घडवून आणून वेलूपिल्लई प्रभाकरनने खळबळ उडवली होती.

पुण्याच्या वस्तीतून मुंबईच्या झगमगाटापर्यंत… Bigg Boss जिंकणारा MC Stan कोण आहे?

- Advertisment -

ताज्या बातम्या