Tuesday, January 6, 2026
Homeदेश विदेशLucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू, अनेक...

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू, अनेक गंभीर जखमी

लखनौ | Lucknow
उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर, इतर गंभीर प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या बसमधून ६० प्रवासी प्रवास करत होते. चालकाने काच फोडली, बसमधून उडी मारली आणि पळून गेला. आग इतकी भीषण होती की अवघ्या १० मिनिटांत ती पूर्णपणे जळून खाक झाली असून या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, लखनौच्या मोहनलालगंज भागातील किसान पथवर ही घटना घडली, दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या एका खाजगी स्लीपर बसला अचानक आग लागली. बहुतेक प्रवासी झोपेत असताना हा अपघात झाला. आग इतक्या वेगाने पसरली की अवघ्या १० मिनिटांत संपूर्ण बस जळून खाक झाली. बसला आग लागताच चालक आणि कंडक्टरने बसमधून उडी घेतली. आगीमुळे मुख्य दरवाजा अडकल्याने उघडत नव्हता. त्यामुळे प्रवाशांना बाहेर येता आले नाही. काहींनी काचा फोडून उड्या मारल्या. पीजीआय कल्लीजवळील किसान पथावर हा अपघात झाला. स्थानिक लोकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली.तर, बसमधील ८० प्रवाशांनी बसच्या काचा फोडून स्वत:चा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, आग भीषण होती. ही आग एक किलोमीटर अंतरावरूनही दिसत होती. अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरातील लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले, प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली, पण तोपर्यंत संपूर्ण बस जळून खाक झाली होती.

YouTube video player

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ६ बंब घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मोहनलालगंजसह इतर अनेक पोलिस ठाण्यांचे पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. तसेच त्यांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून ५ लोकांना मृत घोषित केले. ज्यात दोन मुलांसह पाच जण जिवंत जळाले. या घटनेनंतर डीसीपी आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, पोलिसांनी या घटनेच्या अधिक तपासाला सुरूवात केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Maharashtra News : प्रदूषण नियंत्रण मंडळाला उच्च न्यायालयाचा झटका; ‘या’ सुविधेवर...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) उच्च न्यायालयाने (High Court) झटका दिला . एमपीसीबीला धोकादायक आणि इतर कचरा (व्यवस्थापन...