मुंबई । Mumbai
भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज के एल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वाखाली खेळणारा लखनऊ सुपरजायंट्स (Lucknow Super Giants) संघाला आज कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर (Eden Gardens Stadium) फाफ डू प्लेसिसच्या (Faf du Plessis) रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (Royal Challengers Bangalore) संघाचा सामना करायचा आहे…
बाद फेरीचा (playoffs match) एलिमिनेटर (Eliminator) सामना असल्यामुळे पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येणार आहे. हा सामना सायंकाळी ७:३० वाजता खेळवण्यात येणार आहे.
आजच्या सामन्यात विजयी संघाला शुक्रवारी क्वालिफायर २ (Qualifier 2) मध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर (Narendra Modi Cricket Stadium) सामना खेळायचा आहे. दोन्ही संघांसाठी सामना मस्ट विन सामना असल्यामुळे दोन्ही संघाचा विजय मिळवण्याचा इरादा आहे.
आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या साखळी सामन्यात लखनऊ आणि बंगळूर ((Lucknow and Bangalore) संघांमध्ये झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने डीवाय पाटील स्टेडियमवर (DY Patil Stadium) झालेल्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्स संघाचा पराभव केला होता. आता या पराभवाची परतफेड करण्यासाठी लखनऊ आज मैदानात उतरणार आहे.
आजच्या सामन्यात लखनऊ संघाची धमाकेदार फलंदाजी विरुद्ध बंगळूरची भेदक गोलंदाजी असा सामना रंगणार आहे. दोन्ही संघाची तुलना केल्यास लखनऊ संघाची फलंदाजी अधिक मजबूत आहे. तसेच बंगळूर संघाच्या युवा गोलंदाजांनी प्रत्येक सामन्यात आपले निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे.
लखनऊ संघाने लीग राउंडमध्ये झालेल्या आपल्या १४ सामन्यातील ९ सामन्यांमध्ये विजय तर ५ सामन्यांमध्ये पराभव स्वीकारला आहे. तर लखनऊ संघाची कामगिरी आपल्या आयपीएल पदार्पणात यशस्वी झाली आहे.
आयपीएल साखळीतील १४ सामन्यांमध्ये दमदार कामगिरीच्या जोरावर लखनऊ संघाने अव्वल ४ संघांमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे लखनऊ संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. आता आपली पहिली अंतिम फेरी गाठण्यासाठी लखनऊ सज्ज असणार आहे.
तसेच लखनऊ संघाची मदार सलामीवीर क्विंटन डिकॉक आणि लोकेश राहुलवर (Quinton Decock and Lokesh Rahul) असणार आहे. दोघांकडून संघाला मोठी खेळी अपेक्षित असणार आहे. तर आजच्या सामन्यात लोकेश राहुल , क्विंटन डिकॉक , फाफ डू प्लेसिस , विराट कोहली , दिनेश कार्तिक हे स्टार प्लेअर्स असतील.
सलिल परांजपें, नाशिक