Monday, May 27, 2024
Homeनगरलम्पी संसर्गाची वाटचाल हजाराकडे

लम्पी संसर्गाची वाटचाल हजाराकडे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात लम्पी बाधित जनावरांचा आकडा आता 998 वर पोहचला आहे. यातील 394 जनावरांनी लम्पीवर मात केली असली तरी दैनदिन बाधित येणार्‍या जनावरांची संख्या वाढतच आहे. यामुळे बाधित सापडलेल्या भागाच्या पाच किलो मीटरच्या परिघात असणार्‍या 9 लाख 31 हजार जनावरांचे लसीकरण पशुसंवर्धन विभागाला करावे लागणार आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात गायी आणि म्हशींची संख्या ही जवळपास 16 लाख आहे. यातील सध्या 9 लाख 31 हजार जनावरांना लम्पी संसर्गाचा धोका असल्याने त्याचे तातडीने लसीकरण करण्यात येणार आहे. मंगळवारी लम्पी बाधितांचा आकडा 998 वर पोहचला असून आज लम्पी पिडीतांची संख्या ही एक हजारांचा टप्पा ओलांडणार आहे. दरम्यान जिल्ह्यात लम्पीमुळे मृत पावलेल्या जनावरांची संख्या वाढत असून कालपर्यंत 35 जनावरांचा लम्पीने बळी घेतलेला आहे. जिल्ह्यात 157 गावात लम्पी संसर्गाचे जनावरे सापडलेली असून या गावाच्या पाच किलो मीटरच्या टप्प्यात 824 गावे आहे. जिल्ह्यातील एकूण गावांच्या संख्येच्या निम्मे गावी ही लम्पी रोगाच्या टप्प्यात आहे.

दरम्यान, राज्य सरकारने घोषणा केल्याप्रमाणे लम्पीमुळे मृत होणार्‍या जनावरांच्या मालकांना प्रत्येकी 30 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर नगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून प्रत्येकी 10 हजारांची मदत देण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या