Tuesday, January 6, 2026
Homeक्राईमआमिष दाखवून मारहाण करत युवतीवर अत्याचार

आमिष दाखवून मारहाण करत युवतीवर अत्याचार

बीडच्या तरूणाविरूध्द नगर तालुका पोलिसांत गुन्हा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

लग्नाचे आमिष दाखवून व मारहाण, दमदाटी करत युवतीवर बळजबरीने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित युवतीने नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार करणार्‍या तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिराज शेख (रा. घाटनांदुर अंबेजोगाई, जि. बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. पीडित युवतीने सिराजवर लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. फिर्यादी मुळच्या भोर (जि. पुणे) तालुक्यातील रहिवाशी असून सध्या अहिल्यानगर येथे वास्तव्यास आहेत.

- Advertisement -

सिराज शेख याने त्यांना लग्नाचे आमिष दाखवून खडकी खंडाळा येथील लॉजवर तसेच त्यांच्या घरी शारीरिक संबंध ठेवले. पीडिताने नकार देऊनही सिराजने तिला धमकावून व मारहाण करून संबंध ठेवले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
दरम्यान, सदरची घटना 14 जुलै 2024 रोजी घडली असून पीडित युवतीने सदरचा प्रकार शनिवारी (11 जानेवारी 2025) नगर तालुका पोलिसांना सांगितला. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सायंकाळी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते करत आहेत.

YouTube video player

ताज्या बातम्या

Nashik News : कट चहा ५, कॉफी १२ तर मिसळपाव ‘इतक्या’...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक महापालिका सार्वत्रिक निवडणूक (Nashik Municipal Corporation) २०२६ च्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने स्थानिक प्रचलित दरांची यादी...