Thursday, June 11, 2026
Homeक्राईमCrime News : आमिषाने युवतीवर जबरदस्तीने अत्याचार

Crime News : आमिषाने युवतीवर जबरदस्तीने अत्याचार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

लग्नाचे आमिष दाखवून युवतीला भावनिक ब्लॅकमेल करत अहिल्यानगर येथून पुणे जिल्ह्यात नेऊन तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केल्याचा आरोप एका तरूणावर करण्यात आला आहे. या प्रकरणी मुळची कर्जत तालुक्यातील व सध्या अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगरात राहत असलेल्या पीडित युवतीने (वय 21) दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात बुधवारी (7 जानेवारी) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

कर्जत तालुक्यातील ओम दत्तात्रय सुद्रीक या तरूणावर हा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी युवतीची ओम सुद्रीक याच्याशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती. दोघांमध्ये काही काळ प्रेमसंबंध होते; मात्र त्याने दुसर्‍या मुलीशी संबंध ठेवण्यास सुरूवात केल्यानंतर पीडितेने त्याच्याशी संपर्क तोडला होता. डिसेंबर 2025 मध्ये तिचे काही खासगी फोटो तिसर्‍या व्यक्तीकडून तिला मिळाल्यानंतर हे फोटो ओमकडे अद्याप असल्याचे तिच्या लक्षात आले. फोटो डिलीट करण्यासाठी तिने संपर्क साधला असता, स्वतः येऊन डिलीट कर असे सांगून त्याने तिला येथील तारकपूर बस स्थानकावर बोलावले.

29 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी ओमने तिला कारमध्ये बसवून लग्नाचे आश्वासन दिले व भावनिक ब्लॅकमेल करत पुणे जिल्ह्यातील आळंदी व नंतर मुळशी येथील नातेवाईकांच्या घरी नेले. तेथे एका कागदावर सही करून घेतल्यानंतर, तो कागद ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’चा असल्याचे नंतर सांगण्यात आले. दरम्यान, 1 जानेवारी 2026 रोजी दुपारी ओमने पीडितेवर जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप फिर्यादीत केला आहे.

ताज्या बातम्या

अवैध दारू विक्री विरोधात शिर्डी-सुरत महामार्गावर महिलांचे आंदोलन

0
ओझे l वार्ताहर Oze वणी परिसरातील वाढत्या अवैध दारू विक्रीमुळे त्रस्त झालेल्या महिलांच्या संयमाचा अखेर बांध फुटला असून,माळे फाटा येथे शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या.अनेक वेळा...