Tuesday, March 25, 2025
Homeनगरजादा परताव्याच्या आमिषाने 67 लाखांची फसवणूक

जादा परताव्याच्या आमिषाने 67 लाखांची फसवणूक

मातृतीर्थ सिंदखेड राजा अर्बनच्या संचालक मंडळांविरूध्द गुन्हा

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

सिंदखेड राजा येथील एका बँकिंग संस्थेने शेवगाव येथे धुमधडाक्यात दोन ते तीन वर्षांपूर्वी आपली शाखा सुरू करून दहा ते पंधरा टक्के व्याज दराने ठेवीदारांकडून मोठ्या प्रमाणात ठेवी स्वीकारल्या आणि अचानक टाळे ठोकून या सोसायटीच्या अधिकारी कर्मचार्‍यांनी पोबारा केल्याचा प्रकार घडला आहे. यासंदर्भात काही ठेवीदारांनी एकत्र येऊन संस्थेच्या पदाधिकार्‍यांच्या विरोधात शेवगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

- Advertisement -

शरद दामोदर भांडेकर (वय 50) यांच्या फिर्यादीवरून मातृतीर्थ सिंदखेड राजा अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष दीपक शिंदे, बाबू सिंग चव्हाण, दिलीप गोपाळराव वाघमारे, सचिव मोहन रुस्तुम माघाडे यांच्यासह संचालक गजानन उत्तम कुहिरे, राजू रंगनाथ मेहत्रे, प्रकाश गोबरा राठोड, लक्ष्मणराव नानासाहेब भोसले, नीता मोहन माथाडे, सविता निलेश भोसले, निलेश रंगनाथ भुतेकर, उद्धव उत्तम गव्हाड (सर्व रा. सिंदखेडराजा जि. बुलढाणा) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी यांनी जास्त व्याजदर देण्याचे आमिष दाखवून लोकांचा विश्वास संपादन केला. लोकांकडून पैसे स्वीकारून त्यांनी गुंतविलेले मूळ पैसे व त्यावरील परतावा देखील परत केला नाही.

गोळा केलेली रक्कम स्वतःच्या फायद्याकरिता वापरली व अनेकांची आर्थिक फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी शरद भांडेकर यांनी पत्नीच्या नावे चार लाख, स्वतःच्या नावे चार लाख तसेच मेहुणे सचिन वनकुंद्रे यांच्या नावे तीन लाख रूपये असे एकूण 15 लाख रुपये गुंतवणूक केली होती. त्यानंतर ही बँक बंद झाली असून तेथील संचालक मंडळ देखील भेटत नसल्याची माहिती त्यांना मिळाली. शेवगाव येथील कार्यालयात वारंवार गेलो असताना कार्यालय बंद आढळून आले या व्यतिरिक्त गणेश चंद्रकांत कुलकर्णी, शामल महेश साडेगावकर, अर्जुन दगडू कराळे, राजेंद्र ज्ञानेश्वर कराळे, शिवाजी किसन कराळे, योगेश वसंतराव जाधव, सुरेश बप्पासाहेब लांडे, प्रवीण सुरेश लांडे, कानिफनाथ लक्ष्मण धनवट, ज्योती संभाजी वंजारी यांच्यासह अनेकांची सुमारे 67 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक समाधान नागरे अधिक तपास करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...