Friday, May 24, 2024
Homeधुळेमुंबई-आग्रा महामार्गावर लक्झरी बस उलटली ; २० प्रवासी जखमी

मुंबई-आग्रा महामार्गावर लक्झरी बस उलटली ; २० प्रवासी जखमी

धुळे । dhule

पुण्याहून उत्तर प्रदेशातील गोरखपूरकडे जाणारी बस उलटून झालेल्या अपघातात 15 ते 20 प्रवासी जखमी झाले. हा अपघात आज सकाळी मुंबई-आग्रा महामार्गावरील नरडाणा (ता.शिंदखेडा) गावाजनीक जुन्या टोल नाक्याजवळ झाला.

- Advertisement -

अपघाताची माहिती मिळताच नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. लक्झरी बस (क्र.युपी 55 एटी 1833) ही प्रवासी घेवून पुणे येथून गोरखपूरकडे जात होती. आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास नरडाणा गावाजवळील बस उलटली. त्यात 15 ते 20 प्रवासी जखमी झाले.

अपघातची माहिती मिळताच ग्रामस्थांसह नरडाणा पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. सुदैवाने अपघातात जीवित हानी झाली नाही मात्र एका मुलीच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून 15 ते 20 प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांना धुळे जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान लक्सरीवर प्रवासी सामान जास्त असल्याने तसेच बस मध्ये 70 पेक्षा अधिक प्रवासी असल्याने ही लक्झरी बस झोल घेत उलटल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या