Tuesday, March 25, 2025
Homeनगरमढीत लाखो नाथभक्तांनी घेतले समाधीचे दर्शन

मढीत लाखो नाथभक्तांनी घेतले समाधीचे दर्शन

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

चैतन्य कानिफनाथांचा जयघोष करत बुधवारी रंगपचमीला (दि.19) लाखो भाविकांनी मढी येथील कानिफनाथांच्या संजीवन समाधीच्या दर्शनाचा लाभ घेतला. या यात्रेचे वैशिष्ट्ये असलेल्या गाढवांच्या बाजारात तुलनेने कमी उलाढाल झाली तर चालू वर्षी देवस्थान समितीने सीसीटीव्ही कॅमेरे मोठ्या संख्येने बसवल्याने लुटमारीच्या घटना कमी घडल्या तर अस्तन्या घेऊन आलेल्या भाविकांची संख्या या वेळी मोठी होती.

- Advertisement -

राज्यासह देशभर प्रसिद्ध असलेल्या पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या यात्रेस गुरुवारी (दि.13) होळीपासून प्रारंभ झाला आहे. 15 दिवस चालणार्‍या यात्रेसाठी विविध राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक मढी येथे येतात. होळी ते गुढीपाडव्यापर्यंत (दि.30) मढीची यात्रा सुरु राहणार आहे. बुधवारी (दि.19) रंगपंचमीला यात्रेचा मुख्य दिवस होता. रंगपंचमीच्या दिवशी कानिफनाथांनी समाधी घेतल्याने आजचा दिवस महत्वाचा मानला जातो. नाथांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी मंगळवारी संध्याकाळपासून गडावर भाविकांची रीघ लागली होती. तर बुधवारी सकाळपासून गडाकडे जाणार्‍या चारही मार्गावर मोठ्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पाथर्डी धामणगाव मार्गावर अनेकदा वाहतूक कोंडी झाली.

मुख्य गडावर अस्तन्या घेऊन आलेल्या भाविकांसाठी स्वतंत्र रांग असल्याने मुख्य गडावर फारसा गोंधळ उडाला नाही. दरवर्षी मुख्य गडावर मोठी गर्दी होऊन खिसे कापण्याच्या मोठ्या घटना घडतात मात्र सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याने या घटनांना आळा बसला तर देवगड येथील भाविकांनी तसेच देवस्थानने लावलेल्या दोनशे खाजगी स्वयंसेवकांनी भाविकांना सुलभतेने दर्शन व्हावे या साठी सेवा दिल्याने भाविकांना नाथांच्या समाधीचे व्यवस्थित दर्शन घेता आले. मागील वर्षी यात्रेत एकही तमाशाफड आला नव्हता मात्र यावेळी एक फड लागला होता. आलेल्या भाविकांना देवस्थानच्यावतीने महाप्रसादाचे वाटप व दर्शनबारीत भाविकांना पिण्याचे थंड पाणी देण्यात आल्याचे कोषाध्यक्ष बबन मरकड यांनी सांगितले.

यात्रेत रेवडी, फोटो व मूर्ती विक्रेते रुद्राक्षांच्या माळा, स्टेशनरी, कटलरी, हॉटेल, खानावळ, शीतपेये, फुटाणे विक्रेते, पान फुलावाल्यांना चांगला धंदा झाला. जिल्ह्याच्या सर्वच आगारातून एसटी बससेवा उपलब्ध करून देण्यात आल्याने तसेच खाजगी वाहनानेही अनेक भाविक आल्याने वाहतुकीची बर्‍या पैकी कोंडी झाली होती. नागपूर दंगल विचारात घेता पोलिसांनी यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. नाथांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर अनेक भाविकांनी नाथषष्ठीसाठी (दि.20) पैठणला जाणे पसंद केल्याने मढी ते पैठण अशी बससेवा सुरु करण्यात आली होती. नाथांचे दर्शन घेतल्यानंतर अनेक भाविकांनी देवीचे धामणगाव, मोहटादेवी, वृद्धेश्वर याठिकाणी दशर्र्नासाठी गेले. मढी येथे आलेल्या भाविकांचे स्वागत अध्यक्ष संजय मरकड, विश्वस्त सचिन गवारे, शिवजीत डांगे, विमल मरकड, डॉ. भाऊसाहेब मरकड, डॉ. विलास मढीकर, शामराव मरकड, रवी आरोळे व डॉ. रमाकांत मरकड यांनी केले.

यंदा गाढवांच्या बाजारात तुलनेने कमी उलाढाल
श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथांच्या यात्रेनिमित्त भरणारा गाढवांचा बाजार राज्यातच नव्हे तर देशात प्रसिद्ध आहे. या यात्रेनिमित्त महाराष्ट्रासह कर्नाटक, राजस्थानमधून गाढव खरेदी, विक्रीसाठी मढीत आणण्यात येतात. या खरेदी विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. यावर्षी गाढवांची संख्या कमी असली तरी गाढवांच्या खरेदीमध्ये दुपटीने वाढ झाल्याचे सागर पवार, आकाश शिंदे, योगेश खरात या गाढव खरेदीदारांनी सांगितले. यात्रेतील गाढवांच्या बाजारात बुधवारी काठेवाडी व गावरान गाढवांची आवक कमी झाल्याने फारशी उलाढाल झाली नाही. गावरान गाढवे वीस ते तीस हजार रुपयांना विकल्याचे व्यापारी अमोल धोत्रे यांनी सांगितले. तर काठेवाडी गाढव पन्नास हजार ते एक लाख रुपयांपर्यंत विकल्याचे व्यापारी बल्लाभाई गुंडाभाई यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...