Friday, October 23, 2026
HomeनगरPathardi : मढीतील स्वस्त धान्य दुकानात धान्याची चोरी

Pathardi : मढीतील स्वस्त धान्य दुकानात धान्याची चोरी

वजनात तफावत, पावत्या न देणे आणि कमी धान्य वाटपाच्या तक्रारी

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

मढी येथील स्वस्त धान्य दुकानात रेशनधारकांना नियमानुसार धान्य न देता कमी धान्याचे वाटप केले जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. धान्याचे वजन करताना तफावत आढळणे, खरेदीची पावती न देणे, तसेच मका व ज्वारीऐवजी पैसे देण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना रद्द करावा आणि कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

- Advertisement -

ग्रामस्थ रेशनचे धान्य घेण्यासाठी दुकानात गेले असता हा प्रकार निदर्शनास आल्याचे निवेदनात म्हटले आहे. धान्याच्या वजनाची तपासणी केली असता पाच किलो धान्यामागे एक किलो धान्य कमी असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. ऑनलाइन नोंदीनुसार 35 किलो धान्य मिळणे अपेक्षित असलेल्या रेशनधारकांना केवळ 23 किलो, तर 50 किलो धान्य मंजूर असलेल्या लाभार्थ्यांना 33 किलो धान्य दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच धान्य घेतल्यानंतर पावती दिली जात नसल्याची तक्रारही करण्यात आली आहे. रेशनधारकांना मका व ज्वारी न देता प्रतिकिलो दहा रुपये देण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.

दुकानात साठा व भावफलकासह आवश्यक नोंदी उपलब्ध नसल्याचे, तसेच कोणत्या लाभार्थ्याला किती धान्य मिळणार याची माहिती दिली जात नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. माहिती विचारणार्‍या ग्रामस्थांशी दादागिरी केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.याची चौकशी करून संबंधित दुकानदाराचा परवाना रद्द करावा आणि दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने सात दिवसांत कारवाई न केल्यास तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.राधाकिसन अंबादास मरकड, फिरोज शेख, नवनाथ देविदास मरकड, साहेबराव कोंडीराम मरकड, बाळू साळवे, सतीश राधाकिसन मरकड, किरण साळवे, भाग्येश मरकड, जावेद शेख, योगेश मरकड, अजिज शेख यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

Akole : सुगाव बुद्रुक येथे दोघे प्रवरा नदीपात्रात बुडाले

0
अकोले |प्रतिनिधी| Akole प्रवरा नदीपात्रात दोघे वाहून गेल्याची घटना गुरुवारी (दि.22) दुपारी तालुक्यातील सुगाव बुद्रुक शिवारात घडली. या घटनेत एकाचा बुडून मृत्यू झाला असून दुसर्‍याचा...