Tuesday, March 25, 2025
Homeनगरमढी यात्रेनिमित्त मोहटा मंदिर दर्शनासाठी अहोरात्र खुले

मढी यात्रेनिमित्त मोहटा मंदिर दर्शनासाठी अहोरात्र खुले

देवस्थान समितीचा निर्णय

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

मढी यात्रेसाठी येणारे लाखोे भाविक मोहटा देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. भाविकांना मोहटा देवस्थान समितीतर्फे सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे. येत्या गुरुवारपर्यंत (दि.20) भाविकांच्या सोयीसाठी अहोरात्र मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. राज्यासह देशभर प्रसिद्ध असलेल्या पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या यात्रेस गुरुवारी (दि.13) होळीपासून प्रारंभ झाला आहे. 15 दिवस चालणार्‍या यात्रेसाठी विविध राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक मढी येथे येतात. होळी ते गुढीपाडव्यापर्यंत (दि.30) मढीची यात्रा सुरू राहणार आहे. आज (दि.19) रंगपंचमीला यात्रेचा मुख्य दिवस आहे. त्यामुळे लाखो भाविक मढी, मायंबा व वृद्धेश्वर तसेच मोहटा गड येथे रंगपंचमीच्या दिवशी येतात.

- Advertisement -

भाविकांच्या गर्दीपुढे मंदिरांची दर्शनाची वेळ कमी पडते. त्यामुळे दर्शनाअभावी भाविकांना माघारी फिरावे लागू नये म्हणून प्रमुख देवस्थान समित्यांनी गर्दीच्या कालावधी पुरते मंदिर अहोरात्र खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मोहटा देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश महेश लोणे व विश्वस्त मंडळानेही विशेष सुविधा पुरवण्याची सूचना देवस्थान समिती प्रशासनाला केली. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे व सर्व कर्मचार्‍यांनी अल्पावधीमध्ये नियोजन पूर्ण केले. मोहटा देवस्थान येथे एकाचवेळी 25 हजार भाविक निवास करू शकतील एवढी व्यवस्था, स्वच्छ परिसर, भरपूर पाणी, सुरक्षा व्यवस्था, महाप्रसाद व्यवस्था, सुलभ दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे.

मंगळवारी (दि.18) भाविकांना आमटी, भाकरी, गुळाची लापशी व भात महाप्रसाद स्वरूपात देण्यात आला. येत्या तीन दिवसांत किमान तीन कोटींहून अधिक रुपयांची आर्थिक उलाढाल मोहटा देवस्थान येथे होण्याची शक्यता आहे. दरम्यान, वृद्धेश्वर येथील महादेवाचे मंदिरही कालपासून अहोरात्र खुले ठेवण्यात येत असून या स्थानाकडे नाथ संप्रदायाची जन्मभूमी म्हणून बघितले जाते. भाविक मढी, मायंबा व वृद्धेश्वर येथे दर्शन घेऊनच पारंपरिक पद्धतीची नाथ यात्रा पूर्ण करतात.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...