Thursday, October 8, 2026
Homeक्राईमNewasa : मध्यमेश्वर बंधार्‍याजवळ महसूल पथकाकडून 25 ब्रास वाळूचा साठा जप्त

Newasa : मध्यमेश्वर बंधार्‍याजवळ महसूल पथकाकडून 25 ब्रास वाळूचा साठा जप्त

5 घरकुल लाभार्थींना केले वाळूचे मोफत वाटप

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा येथील मध्यमेश्वर बंधार्‍याजवळ प्रवरा नदीपात्रात अनधिकृतरीत्या साठवून ठेवलेली सुमारे 25 ब्रास वाळू महसूल विभागाने धडक कारवाई करीत जप्त केली. पथकाने प्रवरा नदीपात्राची अचानक पाहणी केली असता, तेथे निरनिराळ्या ठिकाणी लहान-मोठे असे पाच वाळूचे ढीग आढळून आले.

- Advertisement -

तहसीलदारांच्या समक्ष या वाळूसाठ्याचा रितसर पंचनामा करून तो ताब्यात घेण्यात आला. प्रशासनाने सामाजिक बांधिलकी जपत, जप्त केलेली वाळू नेवासा खुर्द कार्यक्षेत्रातील घरकुल लाभार्थ्यांना मोफत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नेवासा नगरपंचायतीचे घरकुल अभियंता राहुल आढाव यांच्याकडे ताबे पावती देऊन ही बाळू सुपूर्द करण्यात आली.

नगरपंचायतीमार्फत बाळासाहेब निकम, अमोल विखे, अमीन अब्दुल शेख, दिनेश रामू लष्करे व सुनीता अनिल मोरे या घरकुल लाभार्थ्यांना ही वाळू वाटप करण्यात आली. दरम्यान, नदीपात्रातून अनधिकृत वाळू वाहतुकीसाठी वापरला जाणारा मुख्य रस्ता जेसीबीच्या सहाय्याने खड्डे खोदून कायमचा बंद करण्यात आला. या कारवाईत मंडळ अधिकारी अनिल गव्हाणे, ग्राम महसूल अधिकारी धनंजय परदेशी, पल्लवी पवार, नवनाथ लष्करे, राहुल चव्हाण व कृष्णा टेकावडे यांनी भाग घेतला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘एसआयआर’ आंदोलन म्हणजे विरोधकांची नौटंकी!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar विरोधकांना निवडणुकीत यश मिळाले नाही, त्याचे खापर आता ‘एसआयआर’वर फोडले जात आहे. या विषयावरून सुरू असलेली आंदोलने म्हणजे केवळ नौटंकी आहे. या...