Sunday, February 16, 2025
HomeUncategorizedPhoto Galley : गणपती बाप्पा मोरया! नाशकात माघी गणेशोत्सवाचा उत्साह, मंदिरे गजबजली

Photo Galley : गणपती बाप्पा मोरया! नाशकात माघी गणेशोत्सवाचा उत्साह, मंदिरे गजबजली

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दरवर्षीप्रमाणे यंदाही माघी गणेेशोत्सव (Maghi Ganeshotsav) शहरात उत्साहात साजरा झाला. अभिषेक, सत्यनारायण पूजन, भंडारा अशा विविध कार्यक्रमांनी गणेश मंदिरे आज भाविकांनी गजबजून गेली…

- Advertisement -

माघी गणेश चतुर्थीला (Ganesh Chaturthy) माघ विनायक चतुर्थी किंवा तिलकुंड चतुर्थीदेखील संबोधले जाते. आज धार्मिक वातावरणात आणि मंगल विधींनी पहाटेपासूनच पूजाविधीला प्रारंभ झाला. शहरातील चांदीचा सिद्धिविनायक गणपती, सराफ बाजारातील पगडी गणेश, साक्षी गणेश, ढोल्या गणपती, तिळा गणपती, पावन गणेश, मेनरोडचा माघी गणपती, अण्णा गणपती, मेनरोडवरील गणेश मंदिर, गंगेवरील मोदकेश्वर मंदिर, खांदवे गणपती, दशभूजा गणेश, आनंदवल्लीचा नवश्या गणपती, अशोक स्तंभावरील ढोल्या गणपती, उपनगरचे इच्छामणी गणेश, इंदिरानगरचे मोदकेश्वर मंदिर यासह शहराच्या विविध भागांतील गणेश मंदिरांमध्ये (Ganesh Temple) भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी रीघ लावली होती.

मंदिरांमध्ये सहस्त्रावर्तन, अभिषेक, महापूजा अशा कार्यक्रमांची रेलचेल होती. भक्त मंडळांच्या वतीने शहरातील विविध मंदिरांमध्ये साग्रसंगीत पूजन, आरतीसह महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.

यासह सर्व गणेश मंदिरात आकर्षक रोषणाई करण्यात आली. जास्वंदीची फुले, दुर्वांचे हार अर्पण करून गणेशमूर्तींची आकर्षक पूजा झाली.

त्रिमूर्ती दत्त पोलिस अधिकारी वसाहत, अमृतधाम (Amrutdham) येथे श्री शिव शक्ती गणेश सेवा समिती,पंचवटी श्री शिव शक्ती गणेश सेवा समितीतर्फे सकाळी ७ ला श्रींचा अभिषेक त्यानंतर श्री सत्यनारायण पूजन, भंडारा, सायंकाळी प्रसाद वाटप कार्यक्रम झाले.

शिवसेना प्रणित शिवसेवा युवक मंडळाच्या वतीने संत गाडगे महाराज चौक, मेनरोड (Mainroad) येथे माघी गणेश जयंतीनिमित्त श्री गणपतीची (Ganpati) भव्य मूर्ती स्थापन करून सकाळी पूजेचे आयोजन करण्यात आले होते.

वेदमंत्रोच्चारात धार्मिक विधी झाल्यानंतर सार्वजनिक आरती झाली. त्यानंतर चौकात आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या