Tuesday, March 25, 2025
Homeदेश विदेशMaha Kumbh Stamped: "जो घाट जवळ असेल तिथे स्नान करावे"…; चेंगराचेंगरी नंतर...

Maha Kumbh Stamped: “जो घाट जवळ असेल तिथे स्नान करावे”…; चेंगराचेंगरी नंतर CM योगी आदित्यनाथांचे भाविकांना आवाहन

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
आज मौनी अमावस्या आणि शाही स्नानाचा दिवस असून उत्तर प्रदेश प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यात प्रचंड गर्दी झाली आहे. गंगा किनारी प्रयागराजमधील घाटांवर आज काही कोटी भाविक शाही स्नान करतील असा अंदाज आहे.यामध्ये मध्यरात्री (२९ जानेवारी) एक वाजताच्य सुमारास चेंगराचेंगरी झाली. या घटनेत १० जणांचा मृत्यू तर ५० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनवेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना फोन केल्याची माहिती आहे. कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर योगी आदित्यनाथ आणि सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाविकांना स्नानासाठी संगमावर जाऊ नका असे आवाहन केले आहे. त्याऐवजी तुमच्यापासून जो घाट जवळ असेल तिथे स्नान करावे आवाहन केले आहे. संगम घाटाकडे जाण्याचा प्रयत्न करु नका, असे देखील आवाहन योगी आदित्यनाथांनी केले. त्रिवेणी संगम येथे ही चेंगराचेंगरी झाली.

- Advertisement -

मौनी अमावस्या असल्याने बुधवारी पहाटेच्या सुमारास त्रिवेणी संगमाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर शाही स्नानासाठी प्रचंड गर्दी झाली होती. त्यावेळी ही चेंगराचेंगरी झाली. “मौनी अमावस्येला भाविकांना शाही स्नान करता यावे, यासाठी प्रशासनाने अन्य घाट बांधले आहेत, तिथे स्नान करा” असे आवाहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाविकांना केले आहे.

यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, स्नानासाठी अनेक घाट बनवण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी भाविकांना प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आणि कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. याशिवाय अफवांवर विश्वास ठेवू नका,असे देखील ते म्हणाले. कुंभमेळा अधिकारी विजय किरण यादव यांनी देखील योगी आदित्यनाथांना माहिती दिली आहे.

पंतप्रधानांचे तासाभरात दोन फोन
महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तासाभरात दोनवेळा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली. मोदी स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. त्यांनी स्थितीचा आढावा घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुद्धा योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली. केंद्राकडून पूर्ण सहकार्याच आश्वासन दिले.

अखिलेश यादव काय म्हणाले?
समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या घटनेनंतर महाकुंभमेळ्यातील नियोजनातील अव्यवस्थेबद्दल सरकारला धारेवर धरले. भाविकांच्या मृत्यूची बातमी दु:खद आहे, ज्यांचा मृत्यू झाला त्यांना श्रद्धांजली, असे ते म्हणाले. अखिलेश यादव यांनी सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत, ज्यामध्ये गंभीर जखमींना एअर अॅम्ब्युलन्स द्वारे चांगल्या रुग्णालयात दाखल करण्यात यावे. मृत व्यक्तींची ओळख पटवून त्यांचा मृतदेह त्यांच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था करा. जे लोक हरवले आहेत त्यांना पुन्हा त्यांच्यासोबतच्या लोकांसोबत भेटण्यासाठी मदत करा. हेलिकॉप्टरचा चांगला वापर करा. सतयुगापासून सुरु असलेल्या शाही स्नानाच्या अखंड आणि अमृत परंपरांना पाहता सुरक्षा व्यवस्था करुन मौनी अमावस्येचे शाही स्नान पार पाडावे, असे अखिलेश यादव म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...