Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaha Shivaratri 2025 : त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे महाशिवरात्री निमित्त महत्त्वाचा निर्णय

Maha Shivaratri 2025 : त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे महाशिवरात्री निमित्त महत्त्वाचा निर्णय

नाशिक | Nashik

यंदा महाशिवरात्री (Maha Shivratri) दि. २६ फेब्रुवारी रोजी असल्याने जिल्ह्यातील (District) शिवमंदिरे भाविकांच्या (Devotes) गर्दीने चांगलीच गजबजणार आहेत. महाशिवरात्री निमित्त लाखो भाविक भगवान शंकराच्या दर्शनासाठी येणार असल्याने प्रशासनाकडून चोख नियोजन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथील त्र्यंबकराज मंदिराच्या देवस्थान ट्रस्टने भाविकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने (Trimbakeshwar Devasthan Trust) महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिर दोन दिवस २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे (दि.२६ फेब्रुवारी २०२५ ) रोजी पहाटे चार वाजेपासून ते (दि. २७ फेब्रुवारी २०२५) रोजी रात्री नऊ वाजेपर्यंत भाविकांसाठी मंदिर २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. तसेच पूर्व दरवाजा दर्शन बारी येथून भाविकांना दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार आहे.

दरम्यान, भाविकांची त्र्यंबकराजांच्या दर्शनासाठी होणारी गर्दी (Crowd) लक्षात घेता, कोणतीही अप्रिय घटना घडू नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांकरिता सर्व प्रकारचे व्हिआयपी प्रोटोकॉल व गर्भगृह दर्शन बंद ठेवण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे २६ फेब्रुवारी रोजी देणगी दर्शन देखील संपूर्ण दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.

महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

महाशिवरात्र उत्सव २०२५ च्या अनुषंगाने मागील वर्षी सुरू करण्यात आलेल्या सोहळ्यानुसार यावर्षी देखील दि.२४ फेब्रुवारी रोजी मेहंदी तसेच दि.२५ फेब्रुवारी रोजी हळदीचा समारंभ साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने समारंभास अनुसरून फुलांची विशिष्ट सजावट करण्यात येणार आहे. तसेच दि.२५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ ते सायंकाळी ९ या वेळेत बासरी प्रशिक्षण वर्ग, नाशिक यांचा ‘भक्तिमय बासरी वादन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर परंपरेनुसार दि.२६ फेब्रुवारी रोजी दुपारी ०३ वाजता त्र्यंबकराजांची पालखी मंदिरातुन निघून पारंपरिक मार्गानुसार तिर्थराज कुशावर्त येथे षोडशोपचार पुजा करुन संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पालखी पारंपरिक मार्गाने पुन्हा देवस्थानमध्ये येणार आहे.

तसेच पालखी दरम्यान शिव-तांडव ग्रुप तर्फे अघोर नृत्याचे सादरीकरण मंदिरासमोर तसेच मुख्य दोन चौकांमध्ये आयोजित करण्यात आला आहे. तसेच सायंकाळी ८ वाजता नटरंग अकॅडेमी, पुणे प्रस्तुत शिवार्पणमस्तू नृत्य कार्यक्रमाची प्रस्तुती अभिनेत्री प्राजक्ता माळी व सहकलाकार यांचे मार्फत करण्यात येणार आहे. तसेच देवस्थान ट्रस्टतर्फे बुधवारी (दि.२६) रोजी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगावर लघुरुद्र अभिषेक सायंकाळी करण्यात येणार आहे. विशेष महापूजा व पालखी सोहळा रात्री होणार आहे, अशी माहिती देवस्थान ट्रस्टने दिली आहे.

महाशिवरात्री निमित्त ट्रस्टची जय्यत तयारी

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. मंदिराचे गर्भगृह, सभामंडप, प्रवेशद्वार उत्तर आणि पूर्व महाद्वार इत्यादी ठिकाणी फुलांची सजावट करण्यात येणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...