Monday, November 25, 2024
Homeभविष्यवेधमहाभारताला कलाटणी देणारे अद्भूत निर्णय

महाभारताला कलाटणी देणारे अद्भूत निर्णय

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥

- Advertisement -

असे म्हणत श्रीविष्णूंनी जगत्कल्याणासाठी दशावतार घेतल्याचे सांगितले जाते. यातील सर्वांत गाजलेले दोन अवतार म्हणजे श्रीराम आणि श्रीकृष्ण. श्रावण वद्य अष्टमीला कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. नीती, धर्म, न्याय, सत्य, मुसद्देगिरी, राजकारण, चातुर्य, प्रेम, त्याग यांचे मूर्तिमंत उदाहरण. श्रीकृष्णाला पूर्णावतार मानले जाते. महाभारतातील श्रीकृष्णाची भूमिका ही अगदी भिन्न होती. महाभारताच्या युद्धामध्ये श्रीकृष्णाने धर्माला साथ दिली होती. श्रीकृष्णाने हातात शस्त्र न घेता महाभारत युद्धात पांडवांना विजय मिळून दिला. अर्जुनाची द्विधा मनःस्थिती झाली, तेव्हा श्रीकृष्णांच्या मुखातून कालातीत ज्ञान बाहेर पडले, ते म्हणजे भगवद्गीता. एकूण महाभारत काळात श्रीकृष्ण नीती ही अद्भूत ठरली. आजही अनेक अभ्यासक श्रीकृष्णाच्या नीतीवर अभ्यास, संशोधन करत आहेत. श्रीकृष्णांनी घेतलेले काही निर्णय महाभारताला कलाटणी देणारे ठरले. नेमके कोणते आहेत ते निर्णय? जाणून घेऊया…

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥… असे म्हणत श्रीविष्णूंनी जगत्कल्याणासाठी दशावतार घेतल्याचे सांगितले जाते. यातील सर्वांत गाजलेले दोन अवतार म्हणजे श्रीराम आणि श्रीकृष्ण. श्रावण वद्य अष्टमीला कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. नीती, धर्म, न्याय, सत्य, मुसद्देगिरी, राजकारण, चातुर्य, प्रेम, त्याग यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्रीकृष्ण.

महाभारतातील श्रीकृष्णाची भूमिका ही अगदी भिन्न होती. महाभारताच्या युद्धामध्ये श्रीकृष्णाने धर्माला साथ दिली होती. श्रीकृष्णाने हातात शस्त्र न घेता महाभारत युद्धात पांडवांना विजय मिळून दिला. अर्जुनाची द्विधा मनःस्थिती झाली, तेव्हा श्रीकृष्णांच्या मुखातून कालातीत ज्ञान बाहेर पडले,ते म्हणजे भगवद्गीता. एकूण महाभारत काळात श्रीकृष्ण नीती ही अद्भूत ठरली. आजही अनेक अभ्यासक श्रीकृष्णाच्या नीतीवर अभ्यास, संशोधन करत आहेत. श्रीकृष्णांनी घेतलेले काही निर्णय महाभारताला कलाटणी देणारे ठरले. नेमके कोणते आहेत ते निर्णय? जाणून घेऊया…

मुसद्देगिरी

शत्रू सामर्थ्यवान असल्यास त्याचाशी थेट लढण्याऐवजी मुत्सद्दीने लढायला हवे. भगवान श्रीकृष्णाने कालयवन आणि जरासंधाबरोबर अगदी असेच केले होते. कालयवनाला मुचकुंदाच्या हाती ठार मारले, तर जरासंधाला भीमाच्या हातून ठार मारले. हे दोन्ही योद्धा सामर्थ्यवान होते. परंतु श्रीकृष्णाने या दोघांना युद्धाच्या आधीच संपवले. खरे तर सरळ मार्गावरून सर्व काही मिळवणे सोपे नसते. विरोधी पक्ष वरचढ असतात. अशावेळी मुत्सद्दीचा मार्ग निवडायला हवा, असा वस्तुपाठ श्रीकृष्णाने घालून दिला. आजच्या काळातही तो लागू पडतो, असे आपल्याला पाहायला मिळेल.

साहस, धोरण, युक्ती

युद्धामध्ये संख्याबळ महत्त्वाचे नसते. मात्र, साहस, धोरण आणि योग्य वेळी योग्य शस्त्र व योग्य व्यक्तीचा वापर करणे हे महत्त्वाचे आहे. पांडव संख्याबळाने कमी होते. मात्र, ते प्रचंड पराक्रमी होते. कृष्णाच्या धोरणामुळे ते जिंकले. घटोत्कचाला युद्धामध्ये उतरवले, तेव्हा त्याची गरज होती. कर्णाला आपले अमोघास्त्र चालवावे लागले. अन्यथा तो ते अर्जुनावर चालवणार होता. म्हणून त्याचे बलिदान व्यर्थ ठरले नाही. अर्जुनासह पाच पांडवांनी आपल्याबरोबर युद्ध करीत असलेल्या सर्व योद्ध्यांना वेळोवेळी वाचवले. आपल्या एखाद्या योद्धावर विरोधीपक्षाचे सैन्य किंवा योद्धा वरचढ होत आहे, ते त्याच्या मदतीसाठी त्वरित धाव घ्यायचे.

संधीचे सोने, चोख व्यवस्था

महाभारत युद्धात शंभर कौरवांवर पांडव वरचढ ठरले, यामागे श्रीकृष्णाची मुसद्देगिरी, धोरणीवृत्ती आणि नीती कारणीभूत ठरली. युद्धात शत्रूला मारण्याची संधी मिळत असल्यास त्याला त्वरित ठार मारावे. तो वाचल्यास आपल्या पराभवाला कारणीभूत ठरू शकतो. म्हणून कोणत्याही परिस्थितीत शत्रू वाचायला नको. श्रीकृष्णाने गुरु द्रोण आणि कर्ण सोबत हेच केले होते. युद्धामध्ये मरण पावलेल्या सैनिकांचे अंत्यसंस्कार, जखमींवर उपचार, लक्षवेधी सैनिकांच्या जेवणाची व्यवस्था सर्व सैनिकांच्या शस्त्रांचा पुरवठा करण्यासारखे काम व्यवस्थिरित्या पार पाडले. हे सर्व कार्य श्रीकृष्णाच्या देखरेखीखाली आणि चोख व्यवस्थेमुळे शक्य झाले.

धर्म, वचन

कोणतेही वचन, करार आणि तडजोड स्थिर नसते. त्यामुळे देशाचे, धर्माचे, सत्याचे नुकसान होत असल्यास ते मोडायला हवे. श्रीकृष्णाने शस्त्रे न बाळगण्याची आपली घेतलेली शपथ मोडून धर्माचे रक्षण केले होते. अभिमन्यूला भीष्माने बनवलेल्या कायदाविरुद्ध निःशस्त्रच ठार मारले, त्याच क्षणी आता या युद्धात कुठल्याही कायदाचे पालन करावयाचे नाही, असे धोरण श्रीकृष्णाने स्वीकारले. श्रीकृष्णांनी ज्या प्रकारे महाभारत युद्ध हाताळले, त्याचप्रमाणे त्यांनी आपले संपूर्ण आयुष्याला सांभाळले. त्यांनी प्रत्येक योजना व्यवस्थित रचली होती, असे सांगितले जाते.

भगवद्गीता, विश्वरुपदर्शन

महाभारताच्या भयंकर युद्धातही श्रीकृष्णाने गीतेचे ज्ञान दिले. ही घटना सर्वांत आश्चर्यकारक ठरली. एखादी व्यक्ती जीवनाच्या कोणत्याही आघाडीवर युद्ध करत असल्यास त्याला ज्ञान, सत्संग आणि प्रवचन ऐकत राहावे. हे प्रेरणेसाठी गरजेचे आहे. यामुळे त्या व्यक्तीचे लक्ष आपल्या उद्दिष्टाकडे राहते. अर्जुनाच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे श्रीकृष्णांनी सविस्तर, विविध दाखले देत दिली. अर्जुनाचे समाधान होईपर्यंत श्रीकृष्णांनी त्यांना समजावले आणि युद्धासाठी तयार केले. विश्वरुप दर्शन घडवले. आपले हेतू चांगले असल्यास ते पूर्ण करण्यासाठी योग्य मार्गाची निवड केली पाहिजे. सत्य आणि न्यायासाठी साधन काहीही असो. साध्य महत्त्वाचे असते, असे श्रीकृष्ण नीतीतून दिसून येते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या