Saturday, November 16, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMahadev Jankar : जागावाटपावरुन महादेव जानकरांचा महायुतीला ईशारा; जर सन्मानपूर्वक जागा मिळाल्या...

Mahadev Jankar : जागावाटपावरुन महादेव जानकरांचा महायुतीला ईशारा; जर सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाही तर…

नाशिक | Nashik
आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटापाच्या जोरदार बैठका सुरू आहेत. जागा वाटपाबाबतचा फैसला अंतिम टप्प्यामध्ये आला आहे. महायुतीमधील घटक पक्षांना देखील जास्त जागा मिळण्याची अपेक्षा आहे. अशामध्ये रासपचे नेते महादेव जानकर यांनी जागावाटपाच्या मुद्द्यावरून महायुतीला इशारा दिला आहे.

काय म्हणाले महादेव जानकर?
रासपचे नेते महादेव जानकर यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना महायुतीला इशारा दिला. सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास २८८ जागांवर निवडणूक लढणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. रासपची महायुतीकडे ३५ ते ४० जागांची मागणी आहे. शिंदे, फडणवीस, पवार यांच्यातच अजून जागा वाटप होत नसल्याने आमच्याशी चर्चेचा विषय नाही, असा टोला यावेळी महादेव जानकर यांनी लागावला आहे. महायुतीतचे मात्र सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास स्वतंत्र लढण्याची तयारी जानकरांनी दर्शवली आहे.

- Advertisement -

‘जागावाटपात त्या तिघांची चर्चा सुरू आहे, आम्हाला अजून कुणी बोलावले नाही, मी महायुतीतच आहे, तिसऱ्या आघाडीत जाणार नाही. महायुतीत ३५ ते ४० जागा आमच्या पक्षाला सोडाव्यात अशी मागणी आहे. आमच्या चौकात आमची काय औकात आहे ते आम्ही तपासात आहोत, महाविकास आघाडी हवेत आहे. मी माझ्या पायावर खंबीर उभा, एकट्याच्या ताकदीवर १० ते १२ आमदार निवडून आणेल, असेही जानकरांनी ठणकावून सांगितले.

महादेव जानकर यांनी सांगितले की, ‘संविधानिक पदाने कुठल्याही व्यक्तीने जिम्मेदारपणाने चालले पाहिजे. मी माजी मंत्री होतो. आम्ही देखील संयमाने आणि घटनेच्या तरतुदीने चालले पाहिजे. ते देखील तसे चालतील. काही प्रॉब्लेम होणार नाही. भांडण वैगरे काहीच होणार नाही. संयमाने मार्ग सुटतील.

धनगर समाज हा आदिवासींमध्येच आहे फक्त त्याचे अंमलबजावणी करण्याचा बाकी आहे. आदिवासी आणि धनगरांवर अन्याय होणार नाही अशी सरकारची भूमिका आहे. जर काही अडचणी येत असेल तर आदिवासींना अ वर्गात टाका आणि धनगरांना ब वर्गात टाका आमची त्याला हरकत नाही. कुणाचंही आरक्षण कमी होणार नाही, कुणावरही अन्याय होणार नाही याबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकार निर्णय घेईल.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या