Monday, April 28, 2025
HomeजळगावPhotos # पहिल्याच श्रावण सोमवारी महादेवाचा गजर ; भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी

Photos # पहिल्याच श्रावण सोमवारी महादेवाचा गजर ; भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

ॐ त्र्यंबकं यजामहे ऽऽ सुगंधी पुष्टीवर्धनम् उर्वारूकमेव बंधना मृर्त्योमुक्षी यमाम्मृतातऽऽ या मंत्रोच्चारात श्रावण मासातील (month of Shravan) पहिल्याच सोमवारी (First Monday) महादेवाचा गजर (Mahadev’s alarm) करण्यात आला. दरम्यान शहरासह जिल्ह्यातील महादेव मंदिरांमध्ये (Mahadev Temples) दर्शनासाठी भाविकांनी अलोट (Crowded by devotees) गर्दी केली होती.

- Advertisement -

श्रावण महिना हा व्रतवैकल्याचा महिना म्हणून ओळखला जातो. श्रावण मासातील सोमवारीनिमीत्त महादेव मंदिरांमध्ये महापूजेसह शंकराची महाआरती करण्यात येते. श्रावण सोमवारनिमित्त शहरासह जिल्ह्यातील महादेव मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

ओंकारेश्वर देवस्थान ट्रस्ट

शहरातील प्रख्यात असलेल्या ओंकारेश्वर देवस्थान मंदिरात मुंबईहून आणलेल्या फुलांद्वारे शृंगार करण्यात आला होता. सोमवारी सकाळी 5 वा. शिव अभिषेक करण्यात आला. सकाळी 9 ते दु. 12 या वेळेत प्रदीप बेहेडे यांच्या हस्ते लघुरूद्राभिषेकही करण्यात आला. दुपारी प्रदीप जाखेडे यांच्या हस्ते लघुरूद्र अभिषेक पूजन करण्यात आले. सायंकाळी 108 निरांजनींद्वारे महादेवाची महाआरती करण्यात आली. त्यानंतर रात्री श्री संत्सग भजन मंडळातर्फे शिवभजनाद्वारे महादेवाचा गजर करण्यात आला.

जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते आरती

श्रावण सोमवारनिमित्त ओंकारेश्वर मंदिरात दर सोमवारी विशेष अतिथींतर्फे शंकराची पूजा आणि महाआरती केली जाते. आज पहिल्या श्रावण सोमवारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व त्यांच्या पत्नी डॉ. आरती राऊत यांच्याहस्ते ओंकारेश्वराची महाआरती करण्यात आली. त्यांच्या समवेत ओकारेश्वर मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महाआरतीनंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

भाविकांची दर्शनासाठी गर्दी

ओंकारेश्वर मंदिरांसह शहरातील निमखेडी, उमाळे महादेव मंदिर येथे भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. ओंकारेश्वर मंदिर परिसरात भाविकांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. तसेच सामाजिक संस्थांकडून साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत ओंकारेश्वर मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते.

श्रावण महिन्याचा पहिलाच सोमवार असल्यामुळे जळगाव शहरातील महादेव मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत भाविक दर्शन घेत होते. मंदिरांमध्ये बमबम भोलेचा गजर केला जाता होता. त्यामुळे भक्तीमय आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते.

निमखेडी शिवारातही भाविकांचे दर्शन

शहरातील निमखेडी शिवारातील महादेव मंदिर हे जागृत देवस्थान मानले जाते. श्रावण मासानिमित्त निमखेडी महादेव मंदिरात पहाटे महादेवाला महाअभिषेक करण्यात आला. सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिर परिसरात बेलाची पाने, हार, फुले, यांची दुकाने थाटली होती. तसेच मंदिर संस्थांनतर्फे उपवासानिमित्त भाविकांना साबुदाणा प्रसादाचे वाटप करण्यात आले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २८ एप्रिल २०२५ – ही सामूहिक जबाबदारी

0
तापमानाच्या वाढत्या पार्‍याबरोबर राज्याच्या धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. राज्यात सुमारे तीन हजार छोटे-मोठे जल प्रकल्प आहेत. सद्यस्थितीत त्या प्रकल्पांमध्ये सुमारे छत्तीस टक्के...