Thursday, January 8, 2026
Homeदेश विदेशMahakumbh Stamped: वाहनांवर बंदी, व्हीव्हीआयपी पास रद्द; महाकुंभमेळ्यातील दुर्घटनेनंतर योगी सरकारचा महत्वाचा...

Mahakumbh Stamped: वाहनांवर बंदी, व्हीव्हीआयपी पास रद्द; महाकुंभमेळ्यातील दुर्घटनेनंतर योगी सरकारचा महत्वाचा निर्णय

उत्तर प्रदेश | Uttar Pradesh
उत्तर प्रदेशातीलप्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर बुधवारी मौनी अमावस्येच्या दिवशी अमृत स्नानासाठी कोट्यवधी भाविक आले. त्या ठिकाणी ब्रह्म मुहूर्तावर एक ते दोन वाजण्याच्या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी घेतला महाकुंभ मेळा परिसराचा आढावा घेतल्यानंतर काही महत्वाच्या घोषणा केल्या आहे.

महाकुंभ परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली असून, गर्दीचे योग्य व्यवस्थापन आणि भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात आली आहे. व्हीव्हीआयपी पास रद्द करण्यात आले असून कोणत्याही विशेष पासद्वारे वाहनांना प्रवेश मिळणार नाही.

- Advertisement -

४ फेब्रुवारीपर्यंत भाविकांना संगमावर पायी जाण्याची परवानगी असणार आहे. प्रयागराज शहरात चारचाकी वाहनांच्या प्रवेशावरही बंदी घालण्यात आली आहे. शहरात फक्त दुचाकी, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाला प्रवेश दिला जाईल. तसेच, महाकुंभमेळा परिसर वाहनमुक्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

YouTube video player

महाकुंभ मेळ्यातील व्यवस्थेबाबत महत्वाचे बदल करण्यात आले आहे
महाकुंभ मेळा परिसर नो-व्हेहिकल झोन (वाहनमुक्त क्षेत्र)
वाहनांना व्हीव्हीआयपी पासने परिसरात प्रवेश नाही.
भाविकांच्या सुरळीत वाहतुकीसाठी एकेरी वाहतूक व्यवस्था.
बाहेरील जिल्ह्यांमधून येणारी वाहने प्रयागराजच्‍या सीमेवरच थांबवली जाणार.
४ फेब्रुवारीपर्यंत शहरात चारचाकी वाहनांच्या प्रवेशावर पूर्ण बंदी.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल. बुधवारी पहाटे आखाडा मार्गावरील बॅरिकेड ओलांडून काही भाविक अमृत स्नानासाठी गेले. आखाड्यांच्या अमृतस्नानासाठी त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. बॅरिकेड ओलांडून आलेल्या भाविकांमुळे गोंधळ निर्माण झाला व त्यातून दुर्घटना घडली. आदित्यनाथ यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन प्रयागराजमधील परिस्थितीचा आढावा घेतला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात पोलीस पथकावर जमावाचा हल्ला

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur श्रीरामपुरातील वार्ड नं.1 इराणी गल्ली परिसरात शासकीय कर्तव्यावर असलेल्या पोलीस पथकावर हल्ला करण्याची, जमावाला भडकावून आरोपी सोडवण्याची आणि कोयत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न...