Friday, April 25, 2025
Homeदेश विदेशMahakumbh Stampede: ज्या घाटावर चेंगराचेंगरी झाली तो संगम नोज नेमके आहे तरी...

Mahakumbh Stampede: ज्या घाटावर चेंगराचेंगरी झाली तो संगम नोज नेमके आहे तरी काय? इथेच सगळ्यात जास्त गर्दी का झाली?

उत्तर प्रदेश | Uttar Pradesh
महाकुंभात बुधवारी (२९ जानेवारी २०२५) रोजी पहाटे चेंगराचेंगरी झाली. इतकी की यात अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशा परिस्‍थितीत एक प्रश्न समोर येतो की, हे संगम नोज काय आहे, ज्‍या ठिकाणी इतक्‍या मोठ्या प्रमाणात गर्दी होते. प्रयागराजमध्ये त्‍याचे काय महत्‍व आहे. इथेच सगळ्यात जास्त गर्दी होते. त्यामुळे हे संगम नोज काय आहे, इथे असे काय आहे की सगळ्यात जास्त गर्दी इथेच का होते, असा प्रश्न पडतो. त्या ठिकाणाबाबत सविस्सतर जाणून घेऊयात.

प्रयागराजमध्ये संगम नोज स्नानासाठी सगळ्यात महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. असे मानले जाते की या ठिकाणीच यमुना आणि गुप्त सरस्‍वती गंगा नदीला मिळते. त्यामुळे साधूसंत इथेच स्नान करतात. भाविकही इथेच स्नान करायला येतात. महाकुंभा स्नानासाठी अनेक घाट बनवण्यात आले आहेत. पण सगळ्यात जास्त गर्दी संगम नोजवरच पाहायला मिळते.

- Advertisement -

संगम नोजचे क्षेत्र दरवेळी वाढवले जाते. २०१९ च्या तुलनेत यंदाची गर्दी पाहता संगमन नोजचे क्षेत्र वाढवण्यात आले. माहितीनुसार आधी इथे दर तासाला ५० हजार लोक स्नान करतील अशी व्यवस्था करण्यात आली होती. पण यंदा दर तासाला २ लाख लोक स्नान करतील अशी तयारी करण्यात आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, असे सांगण्यात आले की, संगम नोज या ठिकाणी भाविकांनी स्नानासाठी गर्दी केली. ज्‍यामुळे या ठिकाणची परिस्‍थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरी झाली. मात्र यावेळी प्रशासनाकडून अनेक रस्‍ते खुले करण्यात आले आणि गर्दीला वाट मोकळी करून देण्यात आली, ज्‍यामुळे परिस्‍थिती नियंत्रणामध्ये आली आहे.

योगी आदित्यनाथ यांनी केले आवाहन
दरम्यान जे भक्‍त ज्‍या गंगा घाटाच्या जवळ आहे, त्‍याच ठिकाणी त्‍यांनी स्‍नान करावे, अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी साधूसंत आणि भाविकांना केले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...