Tuesday, March 25, 2025
Homeक्राईममहालक्ष्मी मंदिरातून 25 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

महालक्ष्मी मंदिरातून 25 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

पोलिसांपुढे तपासाचे आव्हान

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

संगमनेर (Sangamner) तालुक्यातील तळेगाव भागातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि जागृत देवस्थान असलेल्या श्री क्षेत्र काकडवाडी येथील महालक्ष्मी देवीच्या मंदिराचा (Mahalakshmi Devi Temple) मुख्य दरवाजाचा व गाभार्‍याचा कडी-कोयंडा आणि कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास धाडसी चोरी (Theft) केली. देवीचे दोन चांदीचे मुकुट आणि 51 तोळे वजनाचे मुकुटावरील सोन्याचे पान (Gold Leaf) असा तब्बल 24 लाख 94 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. रविवारी (दि. 9) रात्रीच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात (Sangamner Taluka Police Station) अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की श्री क्षेत्र काकडवाडी (Kakadwadi) येथे महालक्ष्मी माता मंदिर (Mahalakshmi Devi Temple) आणि देवस्थान आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर मंदिर गाभार्‍याचा कडी कोयंडा आणि कुलूप तोडले. देवीच्या एका मूर्तीच्या डोक्यावरील एक 800 किलो आणि दुसर्‍या मूर्तीच्या डोक्यावरील एक किलो वजनाचा चांदीचा मुकुट, चांदीच्या मुकुटांमध्ये बसविलेले 51 तोळे वजनाचे सोन्याचे पान तसेच देवीचे सोन्याचे अन्य दागिने असा मिळून 24 लाख 94 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआर देखील चोरून नेला. पहाटेच्या सुमारास पुजारी मंदिरात आरतीसाठी गेला असता हा चोरीचा (Theft) प्रकार उघडकीस आला.

या घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, तालुक्याचे पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे, पोलीस उपनिरीक्षक एस. एस. सातपुते, उपनिरीक्षक अशोक मोकळ यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. तपासकामी अहिल्यानगर (Ahilyanagar) येथून ठसेतज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. मंदिरात सुरक्षेच्या कारणास्तव सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित होती. मात्र चोरट्यांनी सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआर देखील चोरून नेला. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित होणार असल्याने चोरट्यांनी ही दक्षता घेतली.

त्यामुळे सदर गुन्ह्याचा तपास लावणे पोलिसांसमोर आव्हान ठरले आहे. याप्रकरणी सावळेराम कोंडाजी झुरुळे (रा. काकडवाडी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात (Sangamner Taluka Police Station) गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे. चोरीच्या या घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली असून भाविक आणि ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...