Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्र‘माजी सरपंच समर्पित’

‘माजी सरपंच समर्पित’

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यभरातील 14 हजार 233 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 1 डिसेंबर 2020 ला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

जानेवारी महिन्यांत प्रत्यक्ष निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात असून सोशल मीडियावर आतापासूनच निवडणूकीची रणधुमाळी रंगली आहे.

दरम्यान, ‘माजी सरपंच समर्पित’ अशा आशयाने समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचा 30 सेंकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तर अनेकांनी हा व्हिडिओे स्टेटस्ला ठेवला आहे. त्यातून वर्षानूवर्षे सरपंच पदावर असलेल्यांना अप्रत्यक्षपणे डिवचले आहे. तर महाराजांनी सरपंचपदी नवीन चेहर्‍यांना संधी द्यावी असे सांगतानाच अनेक टर्म सरपंचपदी राहणार्‍यांवर निशाणा साधला आहे.

व्हिडिओत महाराजांनी म्हटले आहे, ‘करा तुम्ही…दोनदा सरपंच केलता ना तुला…तिसर्‍यांदा फॉर्म भरायची काही गरज हे का…झाली ना जिरली ना गावाची…तु बावळटपणा नुसता एकटा लावुन धरतो म्हन्जी…मरायचं का बाकीच्च्यांनी…का बाकी अक्कल नाही गावात कोणाला…तू एकटाच पंडीत हे का…काही बाकीचं गााव काय शॅन खातं काय…तू एकटा शहाणा…बावळटपणा दोनदा घेतला ना बोकांडी तुला गावानं…मग आता तिसर्‍यांदा काह्याला…दुसर्‍याला नकोच का चान्स…बावळट नाहीतं…ते पार स्पंच…’

अनेकांना लागले सरपंच पदाचे डोहाळे!

ग्रामपंचायत निवडणुकांच्या रणधुमाळीस प्रारंभ झाला असून गावकारभारी होण्यासाठी अनेकजण इच्छुक असल्याने राजकारण तापू लागले आहे. अशातच सरपंच पदाचे अनेक इच्छुकांना डोहाळे लागल्याचे चित्र आहे. आताच सोशल मीडियावर भावी सरपंच म्हणून फोटो व्हायरल होत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या