Thursday, November 21, 2024
Homeब्रेकिंग न्यूजसी पी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; हरिभाऊ बागडेही राजस्थानच्या राज्यपालपदी

सी पी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; हरिभाऊ बागडेही राजस्थानच्या राज्यपालपदी

दिल्ली । Delhi

झारखंडचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन (C P Radhakrishnan) यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल (Maharashtra New Governor) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राधाकृष्णन हे रमेश बैस यांची जागा घेतील.

- Advertisement -

तर महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडेंची (Haribhau Bagde) राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान हरिभाऊ बागडे यांच्या रूपाने छत्रपती संभाजीनगरला प्रथमच राज्यपालपदाचा मान मिळाला आहे.

बागडे हे भाजपचे कट्टर नेते म्हणून ओळखले जातात. हरिभाऊ बागडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झाले आहे. यांचा जन्म १७ ऑगस्ट १९४४ रोजी झाला. राज्यात भाजप बाळसे धरत असताना १९८५ मध्ये तत्कालीन औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून ते सर्वप्रथम आमदार झाले.

हे ही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला पाठींबा; पवारांची ‘मराठा मोर्चा’शी चर्चा

१९९५ साली राज्यात युतीचे सरकार आले होते. त्या सरकारमध्ये हरिभाऊ बागडे हे रोहयो मंत्री होते. २००९ मध्ये मात्र त्यांचा फुलंब्री विधानसभा मतदार संघातून पराभव झाला होता. मात्र २०१४ आणि २०१९ असे सलग दोन वेळा त्यांनी विजय मिळवला. २०१४ साली त्यांना विधानसभेचे अध्यक्षही करण्यात आले. सध्या ते विद्यमान आमदारही आहेत.

तसेच ६७ वर्षीय सी.पी. राधाकृष्णन हे मूळ तामिळनाडूचे आहेत. त्यांचा जन्म ४ मे १९५७ रोजी तिरुपूरमधये झाला. वयाच्या १६व्या वर्षापासून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम सुरु केले. कोइमतूर मतदारसंघातून लोकसभेवर राधाकृष्णन रे दोन वेळा निवडून गेले. भाजपचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

२०४४ ते २००७ या कालावधीत त्यांच्याकडे तामिळनाडूची सूत्रे होती. सी.पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती अशा वेळी झाली आहे जेव्हा राज्यात या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. राधाकृष्णन हे दीर्घकाळ भाजपचे सदस्य होते. तामिळनाडूच्या कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोनदा खासदार म्हणून निवडून आले. ते तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत.

हे ही वाचा : लाडकी बहीण योजनेसाठी निधी नाही? अजित पवारांनी विरोधकांना दिलं उत्तर

दरम्यान देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी अनेक राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या आहेत. पाहुयात कोणकोणत्या राज्यात नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या झाल्या आहेत.

  • हरिभाऊ किसनराव बागडे यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
  • जिष्णू देव वर्मा यांची तेलंगणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
  • ओम प्रकाश माथूर यांची सिक्कीमचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
  • संतोष कुमार गंगवार यांची झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
  • रामेन डेका यांची छत्तीसगडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
  • सी एच विजयशंकर यांची मेघालयचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
  • सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
  • आसामचे राज्यपाल श्री गुलाब चंद कटारिया यांची पंजाबचे राज्यपाल म्हणून नियुक्ती. चंदीगडच्या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे.
  • सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे मणिपूरच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला आहे.

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी बनवारीलाल पुरोहित यांचा पंजाबचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडचे प्रशासक म्हणून राजीनामा स्वीकारला आहे. दरम्यान, वरील नियुक्त्या त्यांच्या संबंधित कार्यालयाचा कार्यभार स्वीकारतील त्या तारखांपासून कामकाज सुरू होईल.

हे ही वाचा : “… तर राजकारणातून संन्यास घेईल”; प्रफुल्ल पटेलांचे मोठे विधान

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या