Sunday, October 27, 2024
HomeनाशिकNashik Political : जिल्ह्यातून ५७ अर्ज दाखल; खोसकरांच्या उमेदवारीसाठी भुजबळांची हजेरी

Nashik Political : जिल्ह्यातून ५७ अर्ज दाखल; खोसकरांच्या उमेदवारीसाठी भुजबळांची हजेरी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

विधानसभा निवडणुकीची (Vidihansabha Election) रणधुमाळी गतिमान होऊ लागली असून, काल उमेदवारी अर्ज (Application Candidacy) दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हाभरातील (District) १५ विधानसभा मतदारसंघांत इच्छुकांनी गर्दी केली होती. कालपर्यंत ४५ इच्छुकांकडून ५७ अर्ज दाखल करण्यात आले. काल एकाच दिवशी आमदार अनिल कदम (Anil Kadam) यांच्या सौभाग्यवती वैशाली कदम, आ. हिरामण खोसकर आदींसह १८ उमेदवारांनी २० अर्ज दाखल केले आहेत.

- Advertisement -

हिरामण खोसकरांचा (Hiraman Khoskar) अर्ज दाखल करण्यासाठी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात हजेरी लावली होती. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करण्यासाठी इच्छुकांची लगबग सुरू झाली असून, उमेदवारी दाखल करणाऱ्या इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. काल एकाच दिवसात उमेदवारी दाखल करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक इच्छुक हे दिंडोरी मतदार संघातून होते. दिंडोरी मतदारसंघातून काल ११ अर्ज दाखल झाले. त्यात शरद पवार गटाचे भास्कर गावित यांचा समावेश आहे.

मालेगाव बाह्य मतदारसंघात (Malegaon Outer Constituency) एमआयएमच्या ऐतेजाद तडवी यांच्यासह आठ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. निफाड मतदार संघातून प्रहार जनशक्तीतर्फे गुरुदेव कांदे, काँग्रेस पक्षातर्फे महेश आव्हाड, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वैशाली अनिल कदम यांच्यासह सात जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. नाशिक पश्चिममधून निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या सतीश आस्वारी यांच्यासह सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

सिन्नरमधून (Sinnar) पाच तर येवला कळवण येथे चार- चार अर्ज दाखल झाले आहेत. नांदगाव येथून तीन अर्ज दाखल झाले आहेत, नाशिक पूर्वमधून जितेंद्र भाभे यांच्यासह दोन अर्ज दाखल झाले आहेत. इगतपुरीमधून हिरामण खोसकर व अनिता घारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. चांदवडमधून दोन अर्ज दाखल झाले आहेत. देवळालीमधून अविनाश शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर बागलाण, नाशिक मध्य येथून एक-एक अर्ज दाखल झाले आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या