Monday, October 28, 2024
Homeमहाराष्ट्रAjit Pawar : "... अन् भर सभेत अजितदादांना अश्रू अनावर झाले"; 'लाडक्या...

Ajit Pawar : “… अन् भर सभेत अजितदादांना अश्रू अनावर झाले”; ‘लाडक्या बहिणीं’नी दिला धीर, नेमकं काय घडलं?

बारामती | Baramati

विधानसभा निवडणुकीचे (Vidhansabah Election) बिगुल वाजल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीकडून (Mahayuti and Mahavikas Aagahdi) उमेदवार (Candidate) निश्चित झाले आहेत. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना आज राज्यभरातील युती आणि आघाडीच्या उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर पार पडलेल्या प्रचार सभेमध्ये बोलतांना अजित पवार यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : महायुतीच्या उमेदवारांसह अपक्षांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत भरले उमेदवारी अर्ज

अजित पवार म्हणाले की, “मी सुप्रियाच्या विरोधात सुनेत्राला उभे करायला नको होते. त्यानंतर मी मनाचा मोठेपणा दाखवून चूक कबूल केली,पण आता चूक कोणी केली. पहिल्यांदा फॉर्म मी भरणार होतो. आम्ही सर्व तात्यासाहेबांचे कुटुंब,बिकट परिस्थितीमधून आम्ही परिस्थिती चांगली केली. आईने सांगितले होते माझ्या दादाच्याविरोधात फॉर्म भरू नका. फॉर्म कोणी भरायला सांगितला, असे विचारले तर साहेबांनी फॉर्म भरायला लावला. म्हणजे साहेबांनी तात्यासाहेबांचे कुटुंब फोडले का? आम्ही जीवाला जीव देणारी माणसे आहोत. एकोपा टिकवायला पिढ्यानपिढ्या जातात. परंतु तो तोडायला वेळ लागत नाही”, असे सांगताच भर सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अश्रू अनावर झाले. त्यांचा सामना सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांच्याशी होणार आहे.

हे देखील वाचा : Maharashtra Assembly Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची चौथी यादी जाहीर; सात उमेदवारांची घोषणा, कुणाचा समावेश?

यावेळी बोलतांना अजित पवार यांचा कंठ दाटून आला होता. काही काळ अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपले भाषण थांबवले. त्यानंतर उपस्थित महिलांपैकी एका महिलेने उभे राहत दादा रडायचं नाही तुम्ही लढायचं आम्ही बहिणी तुमच्यासोबत आहोत, अशी आरोळी दिली. तर इतर कार्यकर्त्यांकडून देखील याठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच घरातील भांडण चार भिंतीच्या आत झाले पाहिजे. ते चव्हाट्यावर आणण्याची गरज नाही. एकदा दरी पडली कि साधायला दुसरे कोणी येऊ शकत नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षासोबतच कुटुंबात पडलेल्या फुटीवर भाष्य केले.

हे देखील वाचा : मोठी बातमी! भाजपची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; विद्यमान आमदाराचे तिकीट कापून फडणवीसांच्या खास व्यक्तीला मिळाली संधी

पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले की, “आपल्या भागातील लोकांना कामे दिली, काम चोख झाली पाहिजे, उगीच मलिदा मिळाला पाहिजे अशी भूमिका नको.कितीतरी ठेकेदार अधिकाऱ्याकडे जातात कुठे काही चुकले असेल तर मी दुरुस्त करेल. माणूस आहे चुका करतो आणि स्वीकार करतो. तुम्ही मला मोठ केले वरच्या पदावर नेले.वरील नेते मंडळीच्या ओळखी झाल्या ते काय करतात.प्रशासन कसे राबवतात हे पहाता आले. मी जनतेला काय देता येईल याचा विचार करतो. मला यावेळी उभा राहायचे नव्हते, पण कार्यकर्त्यांनी सांगितले”, असेही त्यांनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या