नाशिक | Nashik
राज्यात विधानसभा निवडणुका (Vidhansabha Election) जाहीर झाल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीचा (Mahayuti and Mahavikas Aagahdi) काही जागांवर अजूनही तिढा कायम असला तरी उमेदवारांची (Candidate) घोषणा करण्यात येत आहे. त्यामुळे काही जागांवर तिढा सुटतांना दिसत आहे. अशातच आता महाविकास आघाडीचा नाशिक पूर्वच्या (Nashik East Constituency) जागेचा तिढा सुटला असून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेवर उमेदवार देण्यासाठी भाजपला मोठा धक्का दिला आहे.
हे देखील वाचा : Nashik Political : नाशिक मध्यमध्ये वसंत गिते विरुद्ध वसंत गिते
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP Sharad Pawar) पक्षाकडून भाजपचे (BJP) मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय व माजी नगरसेवक आणि दोन वेळचे सभापती असलेले गणेश गीते (Ganesh Gite) यांना नाशिक पूर्वमधून उमेदवारी जाहीर झाल्याची माहिती समोर आली आहे. थोड्याच वेळात गणेश गीते हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असून त्यानंतर त्यांची अधिकृत उमेदवारी जाहीर होणार आहे.
हे देखील वाचा : Nashik Political : जिल्ह्यातून ५७ अर्ज दाखल; खोसकरांच्या उमेदवारीसाठी भुजबळांची हजेरी
दरम्यान, गणेश गीते हे भाजपकडून (BJP) नाशिक पूर्वमधून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. मात्र, पक्षाने याठिकाणी विद्यमान आमदार राहुल ढिकले यांना पुन्हा उमेदवारी दिली. त्यामुळे गीते नाराज झाले होते. त्यानंतर त्यांनी विविध पक्षांकडून उमेदवारीसाठी (Candidate) चाचपणी सुरु केली होती. यानंतर आता त्याच्या या चाचपणीला जवळपास यश आल्याचे निश्चित झाले आहे. गीते यांच्या उमेदवारीमुळे भाजप उमेदवार राहुल ढिकले (Rahul Dhikale) यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण होणार आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा