Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! भाजपची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; विद्यमान आमदाराचे तिकीट कापून...

मोठी बातमी! भाजपची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; विद्यमान आमदाराचे तिकीट कापून फडणवीसांच्या खास व्यक्तीला मिळाली संधी

मुंबई | Mumbai

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची (BJP) तिसरी यादी (List) जाहीर करण्यात आली आहे. याआधी ९९ उमेदवारी पहिली तर २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता भाजपकडून २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपचे आतापर्यंत १४६ जागांवर उमेदवार घोषित झाले आहेत. यादीत आर्वीतून विद्यमान आमदार दादाराव केचे यांचे तिकीट कापून देवेंद्र फडणवीसांचे (Devendra Fadnavis) स्वीय सहाय्यक राहिलेले सुमित वानखेडे यांना संधी देण्यात आली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : महायुतीच्या उमेदवारांसह अपक्षांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत भरले उमेदवारी अर्ज

या यादीत माळशिरस-राम सातपुते, वर्सोवा- भारती लव्हेकर, तिवसा-राजेश वानखेडे, आर्वी- सुमित वानखेडे, मोर्शी-उमेश यावलकर, नागपूर उत्तर -मिलिंद माने, साकोली-अविनाश ब्राह्मणकर, सावनेर-आशिष देशमुख, चंद्रपूर-किशोर जोरगेवार, घाटकोपर पूर्व-पराग शहा, कराड उत्तर-मनोज घोरपडे, मूर्तिजापूर-हरीश मारोतीअप्पा पिंपळे, कारंजा-साईप्रकाश डहाके, काटोल-चरणसिंग ठाकूर, नागपूर मध्य-प्रवीण दटके, लातूर शहर-अर्चना पाटील चाकूरकर, नागपूर पश्चिम -सुधाकर कोहळे, वसई-स्नेहा दुबे, आर्णी-राजू तोडसोम, देगलूर-जितेश अंतापूरकर, डहाणू-विनोद मेढा, बोरवली-संजय उपाध्याय, आष्टी-सुरेश धस, पलूस कडेगाव-संग्राम देशमुख, उमरखेड-किशन वानखेडे यांचा सामवेश आहे.

हे देखील वाचा : बारामतीतून युगेंद्र पवारांनी भरला उमेदवारी अर्ज; शरद पवार म्हणाले…

दरम्यान, आतापर्यंत महायुतीमधील (Mahayuti) भाजपकडून १४६,शिवसेना (एकनाथ शिंदे) ६५ आणि राष्ट्रवादी (अजित पवार) ४९ उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. तर महाविकास आघाडीतील (Mahavikas Aagahdi) काँग्रेसकडून आतापर्यंत १०० राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ७६ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ८५ उमेदवार घोषित केले आहेत. त्यामुळे महायुतीकडून २८८ पैकी २६० आणि महाविकास आघाडीकडून २६१ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या