मुंबई | Mumbai
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) अखेर विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabah Election) रिंगणात उतरले आहेत. मनसेने (MNS) मंगळवारी जाहीर केलेल्या यादीत माहीम मतदारसंघातून अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता ठाकरे घराण्यातील आदित्य ठाकरे यांच्यानंतर अमित ठाकरे यांच्या रूपाने दुसरा नेता निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना अमित ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार उतरवणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
हे देखील वाचा : Amit Thackeray : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ”तेव्हा माझ्या पोटात…”
त्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेनेही (Shivsena) आपला उमेदवार मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. आज मातोश्रीवर माहीम मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महेश सावंत (Mahesh Sawant) यांना माहीम मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. तर महायुतीमधील शिंदेंच्या शिवसेनेकडून आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता सदा सरवणकर विरुद्ध अमित ठाकरे विरुद्ध महेश सावंत अशी तिरंगी लढत माहीम-दादर मतदारसंघात होणार आहे.
हे देखील वाचा : Shahajibapu Patil : “गुलाल नाय उधळला तर फाशी…”; शहाजीबापू पाटलांचं संजय राऊतांना ओपन चॅलेंज
दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेकडून (Thackeray’s Shiv Sena) उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महेश सावंत म्हणाले की, आज उद्धव साहेबांनी माहीममधून माझ्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली आहे. आम्ही सगळेजण मेहनत करुन पुन्हा डौलाने माहीम मतदारसंघावर, प्रभादेवी, दादरवर शिवसेनेचा भगवा फडकवणार आहोत.कितीही जणांचं आव्हान असेल तरी जनतेला रात्री अपरात्री भेटणारा उमेदवार भेटला आहे. त्यामुळे आम्हाला समोर कुणाचे आव्हान आहे, असे वाटत नाही. बाळासाहेबांची शिवसेना जशी काम करत होती. उद्धव ठाकरे यांची शिवसेना ज्या पद्धतीने काम करत आहे. त्याच पद्धतीने काम होणार आहे आणि शेवटी विजय हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा