Monday, October 28, 2024
HomeनाशिकNashik Political : महायुतीच्या उमेदवारांसह अपक्षांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत भरले उमेदवारी अर्ज

Nashik Political : महायुतीच्या उमेदवारांसह अपक्षांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत भरले उमेदवारी अर्ज

नाशिक | Nashik

विधानसभा निवडणुकीचे (Vidhansabah Election) बिगुल वाजल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीकडून (Mahayuti and Mahavikas Aagahdi) उमेदवार (Candidate) निश्चित झाले आहेत. त्यानंतर आता युती आणि आघाडीचे उमेदवार जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपआपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये देखील महायुतीच्या उमेदवारांसह अपक्षांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज (Application Candidacy) दाखल केला.

- Advertisement -

यात नाशिक मध्य मतदारसंघातून महायुतीमधील (Mahayuti) भाजपच्या उमेदवार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांनी अशोकस्तंभ ते एमजी रोड अशी भव्य रॅली काढत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, माजी खासदार हेमंत गोडसे, यांच्यासह आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते. तर काँग्रेसच्या हेमलता पाटील यांनी देखील नाशिक मध्य मतदारसंघातून एक अपक्ष आणि एक पक्षाकडून असे दोन उमेदवारी अर्ज भरले आहेत. या मतदारसंघातून मविआकडून शिवसेना उबाठा पक्षाचे वसंत गीते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर हनिफ बशीर यांनी देखील नाशिक मध्य मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

तसेच नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून (Nashik West Assembly Constituency) भाजपकडून सीमा हिरे यांनी अर्ज दाखल केला. तर याच मतदारसंघातून भाजपकडून शशिकांत जाधव बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यासोबतच मनसेचे दिनकर पाटील व माकपचे डॉ. डी एल कराड यांनी देखील नाशिक पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. तर देवळाली मतदारसंघातून महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सरोज आहिरे यांनी अर्ज दाखल केला.

याशिवाय देवळालीतून (Deovlali) अपक्ष उमेदवार म्हणून माजी नगरसेवक संतोष शंकर साळवे आणि माजी मंत्री बबन घोलप यांचे पुतणे रविकिरण चंद्रकांत घोलप यांनी अर्ज दाखल केला आहे. नाशिक पूर्व मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राहुल ढिकले, मनसेचे उमेदवार प्रसाद सानप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार निर्मला गावित आणि माजी जिल्हा परिषद सदस्य कावजी ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात ( Collector’s Office) निवडक लोकांना प्रवेश असल्यामुळे काही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी वेगळी शक्कल लढवत आतमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांना रोखण्यासाठी पोलिसांची मोठ्या प्रमाणावर दमछाक होतांना दिसली. तसेच बॅरेकेडींगमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर काही वेळ वाहने खोळंबली होती. त्यामुळे शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांना फटका बसला होता. यामुळे जिल्हाधिकारी परिसरात काहीवेळ वादविवाद झाल्याचे दिसून आले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या