Tuesday, March 25, 2025
Homeमहाराष्ट्रMaharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; कुणाला...

Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; कुणाला मिळाली संधी?

मुंबई | Mumbai

काही दिवसांपूर्वी काँग्रेसने (Congress ) ४८ उमेदवारांची (Candidate) पहिली यादी (First List) जाहीर केली होती. त्यानंतर आज दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून त्यात २३ उमेदवारांचा समावेश आहे. दिल्लीमध्ये शुक्रवारी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या (Central Election Committee) बैठकीनंतर काही जागांवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. यानंतर आज ही यादी प्रसिद्ध करण्यात आली. तसेच ज्या जागांवर अद्याप निर्णय झालेला नाही त्या जागांवर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

या यादीत कोल्हापूरच्या (Kolhapur) शिरोळ मतदारसंघातून काँग्रेसकडून गणपतराव पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गणपतराव पाटील हे शिरोळच्या दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. महाविकास आघाडीकडून शिरोळची जागा काँग्रेसला मिळावी, यासाठी सतेज पाटील यांच्याकडून प्रयत्न सुरू होते. यानंतर ही जागा काँग्रेसला सुटली असून आता अपक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर विरुद्ध काँग्रेसच्या गणपतराव पाटलांमध्ये सामना रंगणार आहे.

हे देखील वाचा : Nashik Political : काँग्रेस कमिटीला कार्यकर्त्यांनी ठोकले टाळे; शहरात एकही जागा न सुटल्याने संताप

दरम्यान, काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीची आज ऑनलाईन बैठक पार पडणार आहे. जागावाटपात कठोर भूमिका न घेतल्याने मित्रपक्षांना जास्त जागा सोडाव्या लागल्याने काल राहुल गांधी (Rahul Gnadhi) यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज पुन्हा होत असलेल्या बैठकीला महत्त्व आले आहे. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, रमेश चेन्नीथला, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, सतेज पाटील, बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...