Friday, November 15, 2024
Homeब्रेकिंग न्यूजAjit Pawar-Devendra Fadnavis : ‘बटेंगे तो कटेंगे’वरून देवेंद्र फडणवीस-अजित पवार आमने सामने?

Ajit Pawar-Devendra Fadnavis : ‘बटेंगे तो कटेंगे’वरून देवेंद्र फडणवीस-अजित पवार आमने सामने?

मुंबई । Mumbai

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. प्रचाराला वेग आला असून, बड्या नेत्यांच्या प्रचार सभा सुरू आहेत. भाजपकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समावेश स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये करण्यात आला आहे. योगी आदित्यनाथ यांनी निवडणुकी प्रचारादरम्यान ‘बटेंगे तो कटेंगे’ हे वक्तव्य सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय झाला आहे.

- Advertisement -

विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला. दुसरीकडे या वक्तव्यावरून महायुतीमध्येच बेबनाव सुरू असल्याचं विविध नेत्यांच्या प्रतिक्रियांवरून दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेला विरोध केला आहे. मात्र, आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना या घोषणेचा अर्थ लक्षात आला नाही, असा टोला लगावला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं आहे.

अजित पवार काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस यांना ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेबाबत काय वाटतं ते मला माहिती नाही. मात्र, मला ‘बटेंगे तो कटेंगे’ ला विरोध असल्याचे अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हंटल. ‘बटेंगे तो कटेंगे’ला आम्ही सगळ्यांनी विरोध केला आहे. भाजपमध्ये पंकजा मुंडे, महाजन यांनीही ‘बटेंगे तो कटेंगे’ला (Batenge to Katenge) विरोध केल्याचे माझ्या कानावर आले. एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येतात आणि ‘बटेंगे तो कटेंगे’बोलतात. आम्ही लगेच त्याला विरोध केला. आम्ही सांगितले की, हा उत्तर प्रदेश नाही. हे उत्तरेत चालत असेल. पण आमच्या महाराष्ट्रात शिव-शाहू-आंबेडकरांची विचारधारा चालते. मी जेव्हापासून राजकारणात आलोय तेव्हापासून पाहतोय महाराष्ट्र दुसरी कोणतीही विचारधारा स्वीकारत नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

‘बटेंगे तो कटेंगे या घोषणेचा अर्थ अजित पवारांच्या लक्षात आला नाही. जनभावना अजितदादांच्या लक्षात आली नाही. देशाचा इतिहास काय सांगतो. या देशात जेव्हा जेव्हा आमचा समाज जातींमध्ये वाटला गेला, प्रांतात वाटला गेला. किंवा विविध कारणांनी वाटला गेला तेव्हा आम्ही गुलामीत गेलो. देशही कटला, समाजही कटला आणि व्यक्तीही कटला. त्यामुळं ते सातत्याने सांगतात की हे जे राजकारण चाललं आहे. जातीजातींमध्ये विभाजन करण्याचे, यापासून सावध राहा. एकत्र राहिलो तर शक्ती आहे, वाटलो गेलो तर संपावं लागेल. याला चांगल्या शब्दांत मोदींनी सांगितलं आहे की एक है तो सेफ है, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. बटेंगे तो कटेंगे याचा अर्थ काय हे मोदींनी देखील सांगितले आहे. आज ३५० जाती मिळून ओबीसी घटक आहे. ओबीसी आहेत म्हणून एक फोर्स आहे. तो ओबीसी जर ३५० जातींमध्ये विखुरला गेला तर फोर्स राहणार नाही. आदिवासी एसटी म्हणून फोर्स आहे. पण ५४ जाती त्यात आहेत. या जाती वेगळ्या झाल्या तर काय होईल?, असा सवालही फडणवीसांनी केला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या