नाशिक | Nashik
राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) रणधुमाळी असून कालपासून (दि.२२) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, महायुती आणि महाविकास आघाडीचे (Mahayuti and Mahavikas Aagahdi) जागावाटप अद्याप जाहीर झालेले नाही. पंरतु, महायुतीकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून अद्यापही जागावाटप किंवा उमेदवार घोषित झालेले नाही. मात्र, मविआकडून संभाव्य उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेकडून (Thackeray ShivSena) नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) १५ पैकी काही मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांना एबी फॉर्मचे ( AB Forms ) वाटप करण्यात आले आहे. यात नाशिक मध्य मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी आमदार वसंत गीते यांना एबी फार्म देण्यात आला आहे. तर नाशिक पश्चिमधून सुधाकर बडगुजर यांना एबी फार्म मिळाला आहे.तसेच मालेगाव बाह्य मतदारसंघातून अद्वय हिरे यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून एबी फॉर्म मिळाला आहे. ते महायुतीचे उमेदवार दादा भुसे यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत.
हे देखील वाचा : Shahajibapu Patil : “गुलाल नाय उधळला तर फाशी…”; शहाजीबापू पाटलांचं संजय राऊतांना ओपन चॅलेंज
तर नांदगावमधून (Nandgaon) गणेश धात्रक यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. धात्रक हे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. याशिवाय निफाडमधून (Niphad) माजी आमदार अनिल कदम यांना एबी फॉर्म देण्यात आल्याचे समजते. तसेच येवल्यातून (Yeola) कुणाल दराडे यांना ठाकरेंच्या शिवसेनेनेकडून एबी फॉर्म देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
हे देखील वाचा : Nashik News : पहिल्या दिवशी ११८ अर्ज विक्री; इच्छुकांमध्ये उत्साह
दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये नाशिक मध्यच्या जागेवरून काँग्रेस (Congress) आणि ठाकरेंच्या शिवसेनेत तिढा असताना वसंत गीते यांना एबी फॉर्म देण्याचे आल्याने राजकीय वर्तुळात ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सुटल्याची चर्चा सुरु झाली आहे. तसेच काल वसंत गीते यांनी मतदारसंघात प्रचाराला देखील सुरुवात केली होती. मात्र, आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून वंसत गीते यांना एबी फॉर्म मिळाल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
हे देखील वाचा : Amit Thackeray : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ”तेव्हा माझ्या पोटात…”
महायुतीचा उमेदवार वेटींगवर
महायुतीमधील घटक पक्ष असणाऱ्या भाजपने आपल्या पहिल्या यादीत नाशिक जिल्ह्यातील पाच पैकी चार विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. मात्र, नाशिक मध्य मतदारसंघाच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांना उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे फरांदे यांनी दोन दिवसांपूर्वी जोरदार शक्तीप्रदर्शन करत मुंबईत समर्थक नगरसेवकांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर अजूनही फरांदे यांना उमेदवारी जाहीर न झाल्याने या जागेवर महायुतीतही तिढा असल्याचे बोलले जात आहे. शिंदेंच्या शिवसेनेने ही जागा आपल्याला सुटावी यासाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे आता ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटली तर या जागेवर कोण उमेदवार असेल याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा