मुंबई | Mumbai
भाजपचे नेते धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी एका प्रचारसभेत बोलतांना “लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या (Congress) रॅलीमध्ये दिसल्या तर त्यांचा फोटो काढायचे आणि आमच्याकडे द्यायचे, आम्ही त्यांची व्यवस्था करू”, असे विधान केले होते. त्यावरून महाडिक यांच्यावर विरोधकांकडून टीकेचा भडिमार केला जात आहे. यानंतर आता महाडिक यांनी केलेल्या वक्तव्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे.
हे देखील वाचा : Sanjay Raut : धनंजय महाडिकांच्या ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, “१५०० रुपयात मतं…”
खासदार धनंजय महाडिक यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये म्हटले आहे की, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करीता निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून निवडणुकीची आचारसंहिता १५ ऑक्टोंबर २०२४ पासून लागू झालेली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने महात्मा फुले युवक मंडळ फुलेवाडी पाचवा स्टॉप फुलेवाडी ता.करवीर येथील राजकीय प्रचाराच्या जाहीर सभेत धनंजय महाडिक यांनी केलेल्या भाषणात भारतीय न्यायसंहिता-२०२३ चे कलम १७९ अन्वये आदर्श आचारसंहितेचे उल्लघंन केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे याबाबतचा खुलासा तात्काळ सादर करण्यात यावा अशी नोटीस त्याच दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी कोल्हापूर दक्षिण यांनी धनंजय महडिक यांना दिली आहे.
हे देखील वाचा : Nashik Political : ‘ड्रग्जमुक्त नाशिक’ लढ्याच्या भितीने आ. फरांदेंविषयी तयार केला जातोय फेक नॅरेटिव्ह
महाडिकांनी मागितली माफी
धनंजय महाडिक यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर राज्यभरातून टीका होण्यास सुरू झाली. त्यानंतर महाडिक यांनी माफी मागितली आहे. ते म्हणाले की, “सर्वप्रथम माझ्या वक्तव्याने कुठल्याही माता भगिनींचे मन दुखावले असेल तर त्यांची मी बिनशर्त माफी मागतो. माझे हे वक्तव्य कुठल्याही माता भगिनीचा अपमान करण्यासाठी मुळीच नव्हते.तर निवडणूक काळात राजकीय प्रचार करताना विरोधी पक्षाच्या खोट्या प्रचाराला बळी पडणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजना ही फक्त महायुती सरकारमुळेच यशस्वी झाली असल्याचे ठामपणे नमूद करताना विशेषतः वोट जिहाद करणाऱ्या महिलांच्या प्रती आलेली स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. मी माझ्या वैयक्तिक, राजकीय आयुष्यात महिलांचा नेहमीच सन्मान करत आलेलो आहे. मी आणि माझ्या पत्नीमार्फत गेली अनेक वर्षे भगीरथी महिला सस्थेमार्फत महिलांच्या आत्मनिर्भरते साठी नेहमीच चांगले काम करत आलो आहे आणि ह्या पुढे देखील करत राहीन. तीन महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरणचा वत माझ्या ह्या प्रयत्नांची दखल घेऊन माझ्या वक्तव्याने मन दुखावलेल्या माझ्या भगिनी मला मोठ्या मनाने माफ करतील, अशी आई अवाचाई चरणी भी प्रार्थना करतो” असे धनंजय महाडिक म्हणाले आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील क्लिक करा