Friday, November 22, 2024
HomeनाशिकNashik Political : माजी खासदार समीर भुजबळांनी नांदगाव विधानसभेतून दाखल केला ...

Nashik Political : माजी खासदार समीर भुजबळांनी नांदगाव विधानसभेतून दाखल केला उमेदवारी अर्ज

नाशिक | Nashik

नांदगाव विधानसभा मतदारसंघातील (Nandgaon Assembly Constituency) नागरिकांना विकासाची मूलभूत हक्क देण्यासाठी तसेच गेल्या पाच वर्षाच्या कालावधी येथील लोकप्रतिनिधीने निर्माण केलेली जनतेवरील दहशत दडपशाही संपवण्यासाठी आपण उमेदवारी (Candidacy) करत आहे. त्यासाठी आशीर्वाद द्यावे असे आवाहन नांदगाव विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी केले. नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांनी भव्य रॅलीद्वारे आज भयमुक्त नांदगाव प्रगत नांदगावसाठी नांदगाव येथे उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नांदगाव शहरात जैन धर्मशाळा येथे भव्य सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन करण्यात आले.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : महायुतीच्या उमेदवारांसह अपक्षांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत भरले उमेदवारी अर्ज

यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले की, आज दिवाळीचा (Diwali) पहिला दिवस असून ही दिवाळी सुखा समाधानाची जावी. तसेच यंदाच्या दिवाळीत नांदगाव शहर भयमुक्त आणि प्रगत नांदगावचा संकल्प करूया.नांदगाव भयमुक्त करण्यासाठी तसेच मतदारसंघाचा खुंटलेला विकास करण्यासाठी उमेदवार बदला किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला संधी द्या अशी मागणी येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र ही जागा त्यांनाच मिळाल्याने अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय आपण घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा : मोठी बातमी! भाजपची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; विद्यमान आमदाराचे तिकीट कापून फडणवीसांच्या खास व्यक्तीला मिळाली संधी

तसेच नांदगावमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून पाणी नाही, मनमाडमध्ये (Manmad) पाणी नाही, मतदारसंघात शेती सिंचनासाठी व्यवस्था नाही. आरोग्याची दुरवस्था झाली आहे शिक्षणासाठी सुविधा नाही. आरोग्याच्या सुविधा नाही व्यवसाय उद्योगासाठी रोजगारासाठी सुविधा नाही. ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी सुविधा नाही असे अनेक प्रश्न या मतदारसंघात आज आहे. या मतदारसंघात जनता सुखी समाधानी राहिली पाहिजे. सर्व वंचित घटकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी ही उमेदवारी असल्याचे समीर भुजबळ म्हणाले.

हे देखील वाचा : Maharashtra Assembly Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची चौथी यादी जाहीर; सात उमेदवारांची घोषणा, कुणाचा समावेश?

पुढे बोलतांना भुजबळ म्हणाले की, आम्ही विकासाच राजकारण करतो. आमदार पंकज भुजबळ यांनी दहा वर्ष या मतदारसंघाचा नेतृत्व करून अनेक महत्त्वपूर्ण विकासकामे केली. आदरणीय भुजबळ साहेबांनी येवला मतदार संघाचा कायापालट केला. नाशिकमध्ये खासदार असताना अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प साकार करून नाशिकच्या विकासात अधिक भर घातली. मात्र कधी कुणाला त्रास दिला नाही आम्ही तोडायचे मोडायचे राजकारण केले नाही तर जोडायचे राजकारण केलं असेही त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Nashik Political : “माझ्या नावाचा वापर करू नये अन्यथा…”; माजी मंत्री बबनराव घोलपांचा कन्येला इशारा

नांदगावातून काढली भव्य रॅली

अपक्ष उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नांदगाव शहरात जैन धर्मशाळा मालेगाव रोड येथून भव्य रॅली काढण्यात आली. ही रॅली शिवाजी चौक, कालिका चौक महात्मा फुले चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जुनी पालिका, अहिल्यादेवी होळकर चौक मार्गे पुन्हा जैन धर्म शाळेजवळ येऊन तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी नांदगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते व नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. वाजत गाजत निघालेल्या या रॅली आनंद उत्सव साजरा करत सहभाग नोंदविला. यावेळी मोटार सायल रॅली द्वारे युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. रॅली दरम्यान भयमुक्त नांदगाव – प्रगत नांदगांव चे फलक नागरिकांनी झळकावले. रॅली दरम्यान जागोजागी समीर भुजबळ यांचे महिलांनी औक्षण केले.यावेळी नांदगांव भयमुक्त झालच पाहिजे अशा घोषणांनी नांदगाव नगरी दणाणून निघाली होती.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या