Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्रMVA Manifesto 2024 : महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस; महिलांना तीन हजार,...

MVA Manifesto 2024 : महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस; महिलांना तीन हजार, ५०० रुपयांत सहा गॅस सिलिंडर ते मोफत बसप्रवास

मुंबई | Mumbai

विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर आज भाजपकडून केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीत पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. भाजपने (BJP) या जाहीरनाम्याला ‘संकल्पपत्र’ (BJP election manifesto 2024) असे नाव दिले असून या संकल्पपत्रात राज्यातील मतदारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीने देखील काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.

- Advertisement -

हे देखील वाचा : BJP Manifesto 2024 : भाजपच्या जाहीरनाम्यात आश्वासनांची बरसात; लाडकी बहिण, शेतकरी, विद्यार्थी, नोकरी यासह विविध क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा

महाविकास आघाडीने या जाहीरनाम्याला ‘महाराष्ट्रनामा’ असे नाव दिले आहे. या जाहीरनाम्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेऐवजी महालक्ष्मी योजना आणण्यात येणार असून त्यातून महिलांना तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांचे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. तसेच बेरोजगार युवकांना दर महिन्याला चार हजार रुपये मानधन देण्यात येणार. तसेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या (Menstrual Cycle) दोन दिवस ऐच्छिक रजा देणार अशी घोषणाही या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Sanjay Raut : धनंजय महाडिकांच्या ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, “१५०० रुपयात मतं…”

यावेळी बोलतांना मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) म्हणाले की, यंदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील (Maharashtra) जनतेच्यादृष्टीने आणि देशाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्राच गौरव पुन्हा स्थापित करण्यासाठी हा महाराष्ट्रनामा आहे. पाच गॅरंटी आधी जाहीर केलेल्या आहेत. सामाजिक बदलांमध्ये महाराष्ट्र सर्वातआधी आहे. त्यामुळे महाराष्ट्राची निवडणूक महत्वाची आहे. आताच्या सरकारला सत्तेतून हटवलं तर आम्हाला चांगले सरकार देता येईल, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : नांदगाव मतदारसंघात समीर भुजबळांचे पारडे जड

महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातील घोषणा नेमक्या काय?

१) शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्यास ५० हजारांची सूट
२) आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा आम्ही हटवणार
३) जाती जणगणनना करणार
⁠४) ३०० युनिट वीज वापरणाऱ्यांना 100 युनिट वीज मोफत
५) दोन लाख सरकारी पदे भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणार
६) महिला, लहान मुले-मुली यांच्यासाठी ‘निर्भय महाराष्ट्र’ धोरण आखणार, तसेच ‘शक्ती’
७) कायद्याची अंमलबजावणी करणार
८) २.५ लाख नोकरभरती करणार
९) शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती
१०) शेतमालाला हमीभाव देणार,पीकविम्याच्या जाचक अटी काढणार
११) सुशिक्षीत बेरोजगारांना दरमहा 4 हजार मानधन
१२) अडीच लाख सरकारी नोकऱ्यांची भरती सुरु करणार
१३) बार्टी,महाज्योती,सारथीमार्फतची शिष्यवृत्ती वाढवणार
१४) एमपीएससी परीक्षांचे निकाल 45 दिवसांत लावणार
१५) महात्मा फुले आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार
१६) महायुती सरकारचे पक्षपाती अध्यादेश रद्द करणार
१७) महायुती सरकारने खाजगी व्यक्तींना दिलेल्या भूखंडांवर फेरविचार करु
१८) शहरीकरणाला दिशा देण्यासाठी राज्य नागरी आयोग स्थापन करणार
१९) सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार
⁠२०) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक बनवणार
२१) महिलांसाठी एक्सक्लुझिव्ह इंडस्ट्री स्थापन करणार
२२) बिनाव्याज पाच लाख कर्ज देणार
२३) कंत्राटी नोकरभरती बंद करणार
२४) महायुती सरकारने पक्षपाती भूमिकेतून काढलेल्या अध्यादेशांचा फेरविचार करणार
२५) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार, या निवडणुका एकसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेणार
२६) सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार
२७) शिवभोजन थाळी योजना केंद्रांची संख्या वाढविणार
२८) जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने पावले उचलणार
२९) वीजग्राहकांचा विरोध लक्षात घेऊन प्रीपेड मीटर्स योजनेचा आढावा घेणार
३०) युवकांच्या कल्याणासाठी ‘युवा आयोगा’ची स्थापना करणार

महाविकास आघाडी पहिल्या १०० दिवसांत काय करणार?

महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना दरमहा ३ हजार रुपये देणार
महिलांचा बस प्रवास मोफत करणार
सहा घरगुती गॅस सिलेंडर ५०० रुपयांत देणार
महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दोन दिवस ऐच्छिक रजा देणार
जन्मास आलेल्या प्रत्येक मुलीस १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर ०१ लाख रुपये देणार

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या