Friday, November 22, 2024
HomeनाशिकNashik Political : नाशिक पश्चिमची लढत विविधरंगी; प्रबळ दावेदारांमुळे उमेदवारांचा लागणार कस

Nashik Political : नाशिक पश्चिमची लढत विविधरंगी; प्रबळ दावेदारांमुळे उमेदवारांचा लागणार कस

नाशिक | रवींद्र केडिया

नाशिक पश्चिम विधानसभेमध्ये (Nashik West Constituency ) विविध पक्षांद्वारे उमेदवार देण्यास सुरुवात केल्यामुळे तिरंगी वाटणारी लढत आता विविधरंगी दिसू लागली आहे.नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना-भाजप (Shivsena and BJP) युतीचा बालेकिल्ला मानला जात होता. कालांतराने या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने सलग दोन वर्षे विजय मिळवत मतदारसंघ आपल्या नावे करून घेतला सातत्याने प्रयत्न करूनही शिवसेनेला या मतदारसंघात विजय मिळवता आला नाही. या निवडणुकीत मात्र शिवसेनेने कंबर कसली आहे. त्यासोबतच विविध राजकीय गणितांचे आखाडेबांधणी काही अंशाने भारतीय जनता पक्षासाठी ही लढत अवघड होताना दिसून येत आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; कुणाला मिळाली संधी?

भारतीय जनता पक्षाचे खंदे समर्थक ज्येष्ठ नगरसेवक दिनकर पाटील (Dinkar Patil) यांनी बंडखोरी करत मनसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच माजी आमदार नितीन भोसले हे देखील मैदानात उतरण्याची तयारी करीत आहेत. माजी महापौर दशरथ पाटील यांनी महापौर कार्यकाळात केलेल्या कामाचा पाठबळावर निवडणूक मैदानात आपले आव्हान निर्माण केले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये (Election) मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha) माध्यमातून मतदानाच्या टक्केवारीत मोठा फरक पडणाऱ्या ‘जरांगे फॅक्टर’ या निवडणुकीत पुन्हा एकदा उफाळून वर येताना दिसून येत आहे. या चळवळीतील समन्वयक करण गायकर हे देखील जरांगे यांच्या पाठबळावर मैदानात सुधारण्याचा आवाज देताना दिसून येत आहे.त्यामुळे वरवर साधारण वाटणारी निवडणूक आगामी काळात अतिशय रंगतदार होताना दिसून येणार आहे. या निवडणुकीमध्ये जात, पंथ, पक्ष या सर्वांचा वापर केला जाणार आहे.

हे देखील वाचा : Nashik Political : निफाडमध्ये उमेदवार कोण?

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघांमध्ये १८ झोपडपट्ट्या असून त्यांच्या मतांचे परिणाम देखील मोठ्या प्रमाणात दिसून येणार आहे. यासोबतच सातपूर अंबडलिंक रोडवर असणाऱ्या मुस्लीम वसाहतीमुळे निवडणुकीचा निकाल कोणत्या दिशेला वळेल, याचे आखाडे बांधले जात आहेत. कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा (कसमादे) चांदवड, येवला, नांदगाव (चायना) परिसरातील नागरिक, मराठा मतदार, झोपडपट्टी परिसरातील कष्टकरी, कामगार, बहुजन समाजाच्या वेगवेगळ्या गरजा आणि वेगवेगळ्या मागण्या आहेत. त्यांची पूर्तता करणारे उमेदवारच या निवडणुकीत बाजी मारून जातील. मात्र या सर्व गणितांना योग्य दिशेने मांडून त्याची गोळाबेरीज करणारा उमेदवार निवडणुकीत टिकाव धरु शकणार आहे.

हे देखील वाचा : Nashik Political : भुजबळ, झिरवाळ आणि कोकाटेंविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ‘या’ बड्या नेत्यांना उमेदवारी

विद्यमान आ. सीमा हिरे (Seema Hiray) यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या लोकांच्या मदतीचा परतावा घेण्याची ही वेळ आहे. तर शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांची पक्ष फुटीनंतरच्या पडतीच्या काळात पक्षाला सावरत, पक्ष बांधणी करून संघटना व कार्यकर्त्यांना एक संघ ठेवण्यात दिलेल्या योगदानाचे व संघटन कौशल्य आणि नागरिकांशी असलेल्या त्यांचा संवादाच्या माध्यमातून ते विजयाचा दावा करीत आहे. त्यासोबतच गेल्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात उभा असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अपूर्व हिरे हे शिवबंधनात आलेले असल्यामुळे त्यांची ताकदही बडगुजर यांचे हात बळकट करण्यास मदत करणारी ठरणार आहे.

हे देखील वाचा : मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी उमेदवार यादी जाहीर; कुणाला मिळाली संधी?

भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मागील अकरा वर्षांपासून अखंड परिश्रम करताना विविध समाज संघटनांचे मोट बांधून त्यांची समाज मंदिरे त्यांच्या धार्मिक कार्याला सातत्याने मदतीसाठी उभे राहणाऱ्या माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी आपल्या कार्यकाळातील कामाच्या बळावर निवडणुकीत आव्हान निर्माण केले आहे.माजी आमदार नितीन भोसले यांनी देखील निवडणूक करून रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली असून, प्रत्यक्ष या निवडणुकीसाठी कोण कोण उमेदवार अर्ज दाखल करतात त्यांचे चित्र मंगळवारी (दि.२९) स्पष्ट होणार आहे. त्यामुळे निवडणुकीत कोणा समोर कोणाचे तगडे आव्हान समोर राहील, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न इच्छुकांमध्ये सुरू झाला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या