मुंबई | Mumbai
विधानसभेची निवडणूक (Vidhansabha Election) जाहीर झाल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीकडून (Mahayuti and Mahavikas Aaghadi) उमेदवारांची घोषणा करण्यात येत आहे. आतापर्यंत महायुतीमधील भाजपकडून १४६,शिवसेना (एकनाथ शिंदे) ६५ आणि राष्ट्रवादी (अजित पवार) ४९ उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. तर महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून आतापर्यंत १००,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ७६ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ८५ उमेदवार घोषित केले आहेत. त्यामुळे महायुतीकडून २८८ पैकी २६० आणि महाविकास आघाडीकडून २६१ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. अशातच आता पुन्हा एकदा मविआतील एका घटक पक्षाकडून ७ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
हे देखील वाचा : Nashik Political : महायुतीच्या उमेदवारांसह अपक्षांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत भरले उमेदवारी अर्ज
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून (NCP Sharad Pawar) एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर उमेदवारांची चौथी यादी (Candidate List) जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ७ जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यात माण,काटोल, खानापूर,वाई, दौंड, पुसद आणि सिंदखेडा या मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये माण मतदारसंघासाठी प्रभाकर घार्गे, काटोल-सलील अनिल देशमुख, खानापूर-वैभव पाटील, वाई-अरुणादेवी पिसाळ, दौंड-रमेश थोरात, पुसद- शरद मेंद, सिंदखेडा-संदीप बेडसे यांच्या नावाचा समावेश आहे. याआधी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तीन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
हे देखील वाचा : मोठी बातमी! भाजपची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; विद्यमान आमदाराचे तिकीट कापून फडणवीसांच्या खास व्यक्तीला मिळाली संधी
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. रश्मी बर्वे यांच्याप्रमाणं माझ्या उमेदवारीमध्ये अडथळा आणण्यासाठी दिल्लीतून (Delhi) मोठे वकील आल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांनी माघार घेतली असून त्याठिकाणी मुलगा सलील देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा