Sunday, October 27, 2024
Homeब्रेकिंग न्यूजNashik Political : निफाडमध्ये उमेदवार कोण?

Nashik Political : निफाडमध्ये उमेदवार कोण?

निफाड । संतोष गिरी

निफाड विधानसभा मतदारसंघाच्या (Niphad Assembly Constituency) निवडणुकीत, तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणारा कोणता उमेद्वार निवडून द्यायचा यावर शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. अस्मानी-सुलतानी संकटाने बळीराजाला नागवले आहे. यात द्राक्ष, टोमॅटा, ऊस, भाजीपाला, कांदा उत्पादक हे बागायती पिके करणारा तर सोयाबीन, मका, बाजरी, गहु व अन्य कडधान्य पिके करणारा व जिरायती शेती करणारा शेतकरी भरडला जात आहे. देशाला शेतीविषयक दिशा देणारा किंवा शासनाला जागे करणारा तालुका म्हणून निफाड तालुक्याची ओळख आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : नाशिक मध्यमध्ये वसंत गिते विरुद्ध वसंत गिते

१९८० साली शेतकरी संघटनेच्या कांदा (Onion) अनुदानातून संपूर्ण देशाने शेतकऱ्यांची (Farmer) वज्रमूठ बघितली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही देशाच्या केंद्रीय मंत्र्याला कांदा व शेतमालाच्या भावावरून शेतकऱ्यांनी मतदानाच्या रूपातून घरी पाठवले. मग आता विधानसभेत तोच कित्ता गिरविला जातो की काय, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये होत आहे. कारण केंद्र शासनाने सोयाबीन पिकाला रु.४८९९ हमीभाव देवूनही चार भाव सरकायला तयार नाही. मका व अन्य कडधान्य पिकांचेही असेच हाल होत आहेत.


हे देखील वाचा :
 Nashik Political : जिल्ह्यातून ५७ अर्ज दाखल; खोसकरांच्या उमेदवारीसाठी भुजबळांची हजेरी

निफाड तालुक्याला (Nipahd Taluka) सुवर्णयुग आणणारे कर्मवीरांच्या असिम त्यागातून व सभासदांनी कर्मवीरांच्या हाकेला ओ देत आपल्या घरातील मणी मंगळसूत्र मोडून, गहाण ठेवून निसाका व रासाका उभारणीसाठी योगदान दिले होते. ‘विना सहकार नाही उद्धार’ या काव्यपंक्तीवर कर्मवीर भाऊसाहेब हिरे, कर्मवीर काकासाहेब वाघ, कर्मवीर काकासाहेब मोगल, सहकारमहर्षी तात्यासाहेब बोरस्ते, सहकारमहर्षी त्र्यंबकराव घुगे, कर्मवीर विनायक दादा पाटील, कर्मवीर दुलाजीनाना पाटील, कर्मवीर प्रल्हाद पाटील कराड, कर्मधुरंधर बाळासाहेब वाघ आदिंनी स्वहितापेक्षा सहकाराचा गाडा चालण्यासाठी सामान्य जनतेचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी या दोन्ही कारखान्यांच्या माध्यमातून ऊस उत्पादकांना व तालुक्यातील शेतकऱ्यांच्याच मुलाबाळांना कामगारांच्या रूपाने ‘अच्छे दिन’ आणले होते.

हे देखील वाचा : Nashik Political : भुजबळ, झिरवाळ आणि कोकाटेंविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ‘या’ बड्या नेत्यांना उमेदवारी

मागील काही काळात मोठी निफाडमध्ये औद्योगिक वसाहत आणण्यातही कोणालाही यश आलेले नाही. शेतमालावर प्रक्रिया उद्योग उभारण्यात आले नाही. या निवडणुकीत हे सर्व कळीचे मुद्दे ठरणार आहेत. महायुतीचे विद्यमान आमदार दिलीपराव बनकर, महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) वतीने अनिल कदम तसेच प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उमेद्वारी करणारे गुरुदेव कांदे या तिघांत लढत होते का? इच्छुक उमेदवार म्हणून अनेक वर्षापासून तयारी करणारे भाजप पक्ष निफाड विधानसभा प्रमुख यतिन कदम, लासलगाव बाजार समिती व मविप्र विद्यमान सभापती बाळासाहेब क्षीरसागर, निफाड नगरपंचायत विद्यमान उपनगराध्यक्ष तथा शिंदे गट शिवसेना तालुका प्रमुख अनिल पा. कुंदे हे प्रबळ तीन उमेदवार अन्य पक्षांकडून लढतात की अपक्ष फॉर्म भरतात किंवा काय भूमिका घेतात यावर बरेच चित्र अवलंबून असणार आहे.

हे देखील वाचा : मोठी बातमी! भाजपची दुसरी यादी जाहीर; ‘नाशिक मध्य’चा उमेदवार ठरला

तसेच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी (NCP Sharad Pawar) तालुकाध्यक्ष दिलीप मोरे, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस निफाड तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे, उबाठा शिवसेना तालुकाध्यक्ष सुधीर कराड, निफाड तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष विजय जाधव आदी प्रमुख पक्षांसह मनसे, रिपाई, वंचित, आआप या पक्षांच्या तालुकाध्यक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. माजी आमदार मालोजीराव मोगल यांचे सुपूत्र राजेंद्र मोगल पिंपळगाव मावळते सरपंच भास्करराव बनकर, निसाका माजी अध्यक्ष तानाजी बनकर, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, निसाका माजी अध्यक्ष माणिकराव बोरस्ते, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांचा पाठिंबा कोणाला? हा मुद्दाही कळीचा ठरणार आहे.

हे देखील वाचा : Nashik Political : भाजपचा नेता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या गळाला; नाशिक पूर्वमधून उतरणार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

तर भारतीय जनता पक्षाचे (BJP) जिल्हाध्यक्ष असणारे शंकरराव वाघ हे तालुक्यातील भुमिपूत्र असल्याने त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. सहकारात कार्यरत असणाऱ्या सहकार नेते रमेशचंद्र घुगे, राजाभाऊ राठी, नंदलाल चोरडिया, संपतराव विधाते, सोहनलाल भंडारी, अशोक शाह, मनोज मोरे, सुहास मोरे, भास्करराव बोरस्ते, राजेंद्र शिंदे आदींचा पाठिंबा कोणाला ? यावरही उमेद्वारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या