निफाड। प्रतिनिधी Niphad
निफाड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या शनिवार २३ नोव्हेंबर होणार असून त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. निकाल साधारण दुपारी 12 वाजेपर्यंत अपेक्षित आहे, असे निफाड विधानसभा मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी हेमांगी पाटील यांनी दैनिक ‘देशदूत’ शी बोलताना सांगितले.
हे देखील वाचा – संपादकीय : २२ नोव्हेंबर २०२४ – निरंतर लोकशिक्षण आवश्यक
एकूण टेबल 20 पैकी ईव्हीएम मशीन मतमोजणी करीता 14, पोस्टल मतदान मोजणी करिता 4 आणि ईटीपीएसबी मोजणी करिता दोन ईव्हीएम मशीनच्या 14 टेबलवर एकूण 20 फेर्या होणार आहे. मतमोजणीच्या कामासाठी नेमलेल्या कर्मचार्यांना मतमोजणी केंद्रावर पोहोचेपर्यंत ते कोणत्या टेबलावर बसतील, याची माहिती नसते. (दि.23) सकाळी आल्यानंतरच कळणार आहे. सकाळी 7.45 वाजता स्ट्राँग रूम उघडले जाईल, असे पाटील यांनी सांगितले.
हे देखील वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : सिन्नर विधानसभा मतदार संघातील मतमोजणीसाठी तयारी पूर्ण
आज निफाड विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी हेमांगी पाटील, सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी आढावा घेत अधिकारी व कर्मचारी वर्गाला सुचना केल्या. पोस्टल मतपत्रिकांची मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू होईल आणि ईव्हीएमची मतमोजणी सकाळी 8.30 वाजता सुरू होईल.
हे देखील वाचा–प्रतिक्षा संपली! IPL 2025 चे वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी होणार सुरुवात
निफाड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी रसलपूर शिवारातील निफाड मुख्य प्रशासकीय कार्यालयात होणार आहे. यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक सुरक्षा व्यवस्था यावेळी असणार आहे. स्ट्राँग रूम व मतमोजणी केंद्रास त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था असून स्थानिक पोलीस, राज्य सशस्त्र पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचा बंदोबस्त आहे. ओळखपत्राशिवाय कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही, असे निफाड विधानसभा मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी हेमांगी पाटील भामरे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी सांगितले.
हे देखील वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : कळवण – सुरगाणा मतदार संघातील मतमोजणीची तयारी प्रशासनाकडून पूर्ण
बुधवार (दि.20) संध्याकाळपासून 23 नोव्हेंबर मध्यरात्री 5 वाजेपर्यंत मतमोजणी केंद्रांभोवती संचारबंदी लागू केली आहे. दारू विक्रीला बंदी आहे. कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी होणार असून मतमोजणी कर्मचार्यांना संबंधित विधानसभा मतदारसंघात आधीच प्रशिक्षित करण्यात आले असल्याने निफाड मतदारसंघांचा निकाल दुपारी 12 पर्यंत लागेल. प्रत्येक टेबलवर तीन मतमोजणी कर्मचारी, सूक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक आणि मोजणी सहाय्यक नियुक्त केले आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
मतमोजणी कर्मचारी आणि उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींना सकाळी 6 वाजता येण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी पोस्टल मतदान अधिक असल्याने मतमोजणी निरंत सुरू राहणार आहे. अंतिम फेरीपूर्वी पोस्टल मतांची मोजणी पूर्ण केली जाईल. यावेळी प्रत्येक टेबलवर सीसीटीव्ही कॅमेर्याची व्यवस्था केली असून याशिवाय निवडणूक अधिकार्यांच्या निर्देशानुसार इतर ठिकाणीही सीसीटीव्ही कॅमेरे आणि व्हिडीओग्राफीची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.