Friday, November 22, 2024
HomeनाशिकNashik Political : निफाड मतदारसंघातून गुरुदेव कांदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Nashik Political : निफाड मतदारसंघातून गुरुदेव कांदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

निफाड | Niphad

निफाड विधानसभेच्या निवडणुकीच्या (Niphad Assembly Constituency) पार्श्वभूमीवर सोमवार २९ ऑक्टोबर रोजी हजारो नागरिकांच्या व समर्थकांच्या शक्तीप्रदर्शन दाखवत प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार तथा परिवर्तन महाशक्ती आघाडीचे गुरुदेव द्वारकानाथ कांदे (Gurudev Kande) यांनी दुपारी १२ वाजता निफाड प्रशासकीय निवडणूक निर्णय अधिकारी हेमांगी पाटील यांच्याकडे आपला अधिकृत उमेदवारी अर्ज रिपब्लिक काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष पांडुरंग पगारे, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरदराव शिंदे, प्रहार जिल्हाप्रमुख विलासराव अडांगळे, गणेश डेरे, शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष संजय पाटोळे, युवा उद्योजक राहुल ढोमसे, चापडगाव माजी सरपंच बबनराव दराडे नांदूर खुर्द माजी सरपंच हरिभाऊ कुशारे, खेडे माजी सरपंच राजेंद्र सांगळे यांच्यासह आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : महायुतीच्या उमेदवारांसह अपक्षांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत भरले उमेदवारी अर्ज

उमेदवारी अर्ज (Application for Candidacy) दाखल करत असताना गुरुदेव कांदे यांनी नागरिकांना व समर्थकांना संबोधित करताना आजी-माजी आमदारांना जनता कंटाळली आहे. जनतेला सक्षम पर्याय हवा आहे तो पर्याय जनतेने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यात बघितला आहे. व जनतेच्या आशीर्वादाने वंचित, शोषित, पीडित, मंजुर, दिव्यांग कष्टकरी कामगार, शेतकरी, व्यावसायिक या सर्वांच्या आशीर्वादाने तर प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू, स्वराज्य पक्ष प्रमुख छत्रपती संभाजी राजे, व शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, रिपब्लिकन ऑफ इंडिया चे प्रमुख प्रमुख राजरत्न आंबेडकर, अर्जुन तात्या बोराडे, यांच्या पाठिंब्याने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हा गुरुदेव कांदे चा उमेदवारी अर्ज नसून सर्वसामान्यांचा आवाज विधानसभेत पोहोचण्यासाठी हा उमेदवारी अर्ज आहे. त्यामुळे गुरुदेव कांदे हा उमेदवार नसून तुम्ही सर्व उमेदवार आहात.

हे देखील वाचा : Maharashtra Assembly Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची चौथी यादी जाहीर; सात उमेदवारांची घोषणा, कुणाचा समावेश?

या दृष्टीने आपल्याला ही निवडणूक लढवावी लागणार आहे. कारण आज निफाड तालुक्याला देशाचा कॅलिफोर्निया म्हटले जाते . परंतु या तालुक्यात कर्मवीरांच्या असीम त्यागातून उभा राहिलेला रासाका, निसाका, नाशिक जिल्हा बँक, नांदूरमधमेश्वर धरण व रामसर दर्जा असलेल्या तेथील पक्षी अभयारण्याचा पर्यटन स्थळाचा न झालेला विकास शिवार रस्ते तालुक्यातील तीन महत्त्वाच्या ठिकाणी असलेले उड्डाणपूल, तरुण बेरोजगार युवकांना मोठी औद्योगिक वसाहत नसल्याने हाताला काम नाही, दोन्ही बाजार समित्या असे असंख्य प्रश्न उभे आहेत. परंतु आपल्या स्वतःच्या फायद्याच्या राजकारणासाठी जनतेला गृहीत धरून काम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना यापुढे जनता थारा देणार नाही. व सर्वसामान्यांचे उमेदवार म्हणून आपल्याला या निवडणुकीत जनता विधानसभेत पाठवल्यशिवाय राहणार नाही असा प्रबळ आत्मविश्वास त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना व्यक्त केला.

हे देखील वाचा : मोठी बातमी! भाजपची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; विद्यमान आमदाराचे तिकीट कापून फडणवीसांच्या खास व्यक्तीला मिळाली संधी

तर गुरुदेव कांदे यांना पाठिंबा देणाऱ्या रिपब्लिक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पांडुरंग पगारे यांनी गोरगरीब विचारांचा माणूस म्हणून निफाड तालुक्यातील सर्वसामान्य जनता गुरुदेव कांदेकडे बघत आहे त्यामुळे दोघात तिसरा चेहरा जनतेने व आम्ही सक्षम पर्याय म्हणून उभा केला आहे व तो २० नोव्हेंबर रोजी प्रचंड मताधिक्याने निवडून येणार आहे निसाका व रासाका यांची लागलेली वाट जनतेने बघितली आहे. आजी-माजी आमदार या कामी अपयशी ठरले आहे. त्यामुळे या दोन्ही कारखान्यांना सुगीचे दिवस आणण्यासाठी व पर्यायाने तालुक्याचा विकास करण्यासाठी गुरुदेव कांदे हा पर्याय आपल्याला उपलब्ध झाला आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र येत गुरुदेव कांदे यांना पाठिंबा या निफाड विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून द्यायचा आहे. असे पगारे यांनी सांगितले याप्रसंगी तिन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच तालुक्याभरातून दिव्यांग बांधव आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी डॉ. अशोकराव गांगुर्डे, राजाभाऊ बिवाल, अमजद पठाण, भूषण मोरे, सचिन निकाळे, सुनील पवार, सुनील काळे, आदींसह हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या