Tuesday, January 6, 2026
HomeराजकीयRajesaheb Deshmukh : आमदार झालो तर सगळ्या पोरांची लग्न लावून देतो; शरद...

Rajesaheb Deshmukh : आमदार झालो तर सगळ्या पोरांची लग्न लावून देतो; शरद पवारांच्या उमेदवाराचे अजब आश्वासन

परळी । Parali

सध्याघडीला राज्यात विधानसभा निवडणुकांचे (Assembly Election 2024) वारे वाहत आहे. दरम्यान, या कालावधीमध्ये अनेक राजकीय पक्षातील उमेदवार अनेक प्रकारचे आश्वासन आणि आमिष दाखवत मतदारांचे मत आपल्या पारड्यात पाडून घेण्याचे आटोकाट प्रयत्न करत असतात.

- Advertisement -

अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराने दिलेले एक आश्वासन सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. ‘जर मी आमदार झालो तर सगळ्या पोरांचे लग्न करु देतो,’ असे अजब आश्वासन परळी विधानसभेचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी दिले आहे.

YouTube video player

परळीत आपल्या प्रचाराचा शुभारंभ करताना शरद पवार गटाचे परळीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी अजब आश्वासनं देत मतदारांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ते म्हणाले, तरुण पोरांना लग्नासाठी विचारताना लोक विचारतात, पोराला नोकरी आहे का विचारतात. सरकारच देत नाही तर कशी लागणार..काही उद्योगधंदा आहे का? पालकमंत्र्याचाच उद्योगधंदा नाही तर पोरांचा कसा असेल. यामुळं सगळ्या पोरांचं लग्न होणं अवघड झालंय. त्यामुळं सगळ्या पोरांना मी आश्वासन देतो, जर मी आमदार झालो तर सगळ्या पोरांची लग्न लावून देऊ असं अजब आश्वासन राजेसाहेब देशमुख यांनी केल आहे.

बाबूराव तुमचं लग्न करायचंय..त्यामुळं आगे बढो म्हणल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही असं म्हणताच मतदारांमध्येही हशा पिकला होता. तरुण पोरांना काम मिळवून देणार असं आश्वासनही त्यांनी केले. यावेळी मंचावर बीडचे खासदार बजरंग सोनवणेही उपस्थित होते. राजेसाहेब देशमुख यांच्या या आश्वासनाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

परळीच्या मैदानात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा आमनासामना होत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीरडून मंत्री धनंजय मुंडे मैदानात आहेत, तर पवारांच्या राष्ट्रादीकडून राजेसाहेब देशमुळ नशिब अजमावत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Politics : नाशकात मोठी राजकीय घडामोड; दोन माजी महापौर करणार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) धामधुमीत शहरात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी भाजपमध्ये (BJP) असलेले नाशिकचे दोन माजी...