नाशिक | Nashik
विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) छोट्या पक्षांची मोठी गोची झाली आहे. सहनही होत नाही अन सांगताही येत नाही अशी त्यांची अवस्था झाली आहे. भाजपला (BJP) स्वपक्षाच्या उमेदवाराबरोबरच महायुतीतील (Mahayuti) एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या समर्थकांचे समाधान करता करता काही ठिकाणी बंड झालेले पाहुन स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारलेली दिसत आहे.
हे देखील वाचा : Nashik Political : ना. झिरवाळांनी ननाशीत दवाखाना दिल्याने हजारोंना फायदा – देशमुख
भाजपने ४ जागा मित्रपक्षांसाठी (Allies) सोडल्या आहेत. महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षासाठी (RSP) गंगाखेडची जागा सोडली. त्यामुळे महायुतीशी फारकत घेणारे जानकर पुन्हा महायुतीत आले. बडनेरा ही जागा रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षासाठी सोडण्यात आली. कालिना जागा रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या रिपब्लिकन पक्षासाठी सोडली. शाहूवाडी मतदारसंघ हा विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाला सोडला. कालिनातून भाजपचे नेते अमरजित सिंह रिपाइंच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे. आठवले गटाला भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी लागत आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : प्रवाशांचे दागिने चोरणारा गजाआड
रिपब्लिकन लहान पक्ष असला तरीही जनता जनार्दनचा पाठिंबा आहे. त्यांना १० २० जागा नको होत्या. चार पाच जागा मिळाव्यात अशी अपेक्षा होती. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही रिपब्लिकनच्या मतांचा फायदा होणार आहे. पण तरीही महायुतीच्या नेत्यांनी आमचा विचार केला नाही, असे खुद्द केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीच म्हटले आहे. महायुतीत ही अवस्था तर महाविकास आघाडीतही सारे काही आलबेल नाही. समाजवादी पक्षाप्रमाणेच राज्याचे सीपीएम राज्य युनिटही महाविकास आघाडीने नाशिक शहरातील (Nashik City) पश्चिम जागेसह किमान चार जागा पक्षाला देण्याची विनंती मान्य न केल्याने नाराज आहे.
हे देखील वाचा : Nashik Political : अजितदादांमुळे जोरण, आंबाड, वणी जलयोजना पूर्ण – झिरवाळ
नाशिक पश्चिम येथील उमेदवार डी.एल. कराड यांना पक्षाने एबी फॉर्म दिला असून, त्यांनी सोमवारी या मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली. सीपीएम नेते नरसय्या आडम यांनीही सोमवारी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली. सीपीएमचे विद्यमान आमदार विनोद निकोळे यांनी डहाणू विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली. या जागेवरून महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठाचे उमेदवार सुधाकर बडगुजर निवडणूक लढवत आहेत. नाशिक पश्चिम मतदारसंघातून मंगळवारी बडगुजरांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
हे देखील वाचा : Maharashtra News : निवडणुकीच्या तोंडावर राज्यात पैशांचा महापूर; नाशिक, कसारा घाटात नाकेबंदीत दोन कोटी ३१ लाखांची रोकड हस्तगत
दरम्यान, याआधी सीपीएमला (CPM) विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात १२ जागा लढवायच्या होत्या. तथापि, या दोनच जागा कळवण आणि डहाणूला दिल्या. त्यानंतर, सीपीएमने नाशिक पश्चिम आणि सोलापूर शहर मध्य मतदारसंघ या पक्षाला आणखी दोन जागा सोडण्याचा आग्रह धरला, परंतु मविआला (MVA) तसे शक्य झाले नाही. भारतीय कम्युनिस्ट पक्षाची तर फार दखल घेतली गेली नाही. त्यामुळे यंदाची निवडणूक छोट्या पक्षांना फारशी धार्जीनी झालेली दिसत नाही.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा