Wednesday, October 30, 2024
Homeमहाराष्ट्रRaj Thackeray : "यंदा मनसे सत्तेत येईल अन् भाजपचा मुख्यमंत्री होईल, तर...

Raj Thackeray : “यंदा मनसे सत्तेत येईल अन् भाजपचा मुख्यमंत्री होईल, तर २०२९ मध्ये…”; निवडणूक निकालाआधीच राज ठाकरेंचे मोठे भाकीत

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा मनसे पक्ष संपूर्ण ताकदीनिशी उतरल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील २८८ पैकी १३१ मतदारसंघांत मनसेने उमेदवार उभे केले आहेत. तर दुसरीकडे महायुतीकडून यंदाच्या विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात लढविल्या जात आहेत. त्यामुळे, महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार, कोणत्या पक्षाचा होणार यावर सध्या कुणीही भाष्य करत नाही. मात्र, याबाबत आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोठे विधान केले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Thackeray vs Shinde Shivsena : राज्यातील ‘या’ विधानसभा मतदारसंघांत होणार मशाल-धनुष्यबाण थेट सामना

राज ठाकरेंना एका मुलाखतीत (Interview) या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनसे (MNS) महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) पाठिंबा देणार की महायुतीसोबत जाणार, असा प्रश्न विचारण्यात आला होता.त्यावर बोलतांना ते म्हणाले की, “काम महत्त्वाचे आहे, महाविकास आघाडी निश्चित नाही. शिवसेनेत होतो, तेव्हापासून दुसरा कोणता पक्ष माझ्या आयुष्यात आला असेल, तर तो म्हणजे भाजप (BJP) आहे. प्रमोद महाजन असतील, गोपीनाथ मुंडे असतील, नितीन गडकरी असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, लालकृष्ण आडवाणी असतील, यांचे घरी येणे जाणे होते, यांच्याशीच माझा संबंध आला. माझा कधीही काँग्रेस, एनसीपी यांच्याशी कधीही संबंध आलाच नाही. गाठीभेटी हा भाग निराळा आहे. परंतु, भाजपाप्रमाणे कधी अन्य संबंध आला नाही”, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Nashik Political : शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

पुढे ते म्हणाले की, “आमच्या साथीने २०२४ चा मुख्यमंत्री (CM) भाजपचाच होईल तर २०२९ चा मुख्यमंत्री हा मनसेचा होईल. तसेच नेत्यांची बैठक झाली, अमित म्हणाला की, पक्षाने सांगितले तर प्रत्येकाने लढावे, मी सुद्धा लढेन. त्यावर मी अमितला म्हणालो की, तू सिरियस आहेस, आधी भांडुप बद्दल चर्चा झाली. निवडणूक लढणे हे माझे टेम्परामेंट नाही. मी बाळासाहेबांच्या विचाराने वाढलो, अमितला कसे समजावयचे याचा मी विचार करत होतो, असे राज ठाकरे यांनी सांगितले. तसेच अमित विरोधात माहीममध्ये उमेदवार देणे हा, हा प्रत्येकाचा स्वभावाचा भाग झाला आहे. प्रत्येक जण आपल्या स्वभावानुसार वागत असतो. भाजपसारख्या मॅच्युअर्ड पक्षांना ही गोष्ट कळू शकते, सगळ्यांनाच हे कळेल असे नाही. बाकी प्रत्येकाचे मिळेल ते ओरबाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आपण कोणाला कुठे आणि किती सांगायला जाणार”, असा सवाल राज ठाकरेंनी केला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या